4G सिमवरच 5G चालणार? 26 जुलैला 5G लिलाव; कसे असतील रिचार्ज प्लॅन? कोण करेल सर्वप्रथम लाँच

5G in India: भारतात लाखो 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत परंतु 5G नेटवर्कच्या अभावामुळे ग्राहकांना त्यांच्या डिवाइसची पूर्ण क्षमता अनुभवता येत नाही. 5G च्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. फक्त काही आठवड्यांमध्ये सुपर फास्ट 5जी नेटवर्क सर्व्हिस भारतात उपलब्ध होणार आहे. भारतातील एक अब्जावधीपेक्षा जास्त ग्राहक जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वायरलेस बाजारपेठ आहे. ही बाब लक्षात ठेऊन भारत सरकारनं देशात 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला (5G Auction) मंजुरी दिली आहे. लिलाव प्रक्रिया 26 जुलैपासून सुरु होणार आहे आणि पुढील काही दिवस सुरु राहील. या ऑक्शनमध्ये देशातील बड्या टेलीकॉम कंपन्या सहभागी होतील. विशेष म्हणजे मुकेश अंबानींच्या जियो व्यतिरिक्त गौतम अदानींची कंपनी देखील या लिलावात सहभागी होणार आहे. 5जी सर्व्हिसच्या लिलावाची बातमी ऐकून तुम्हाला अनेक प्रश्न पडेल असतील. जसे की 26 जुलैच्या 5G ऑक्शननंतर 5G सिम (5G SIM) कसं मिळेल, 5G प्लॅन (5G Recharge) कसे असतील आणि Reliance Jio, Vodafone Idea व Airtel पैकी कोणती कंपनी सर्वप्रथम भारतात आपलं 5G नेटवर्क लाँच करेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही या लेखात देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

5G नेटवर्क म्हणजे काय

जगभरात 5जीची सुरुवात झाली आहे आणि भारतात देखील लवकरच हे नेटवर्क लाँच केलं जाऊ शकतं. 5G मध्ये इंटरनेट स्पीड मेगाबाइटवरून गीगाबाइटमध्ये जाईल आणि यात 1gbps म्हणजे 4जीपेक्षा 100 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळेल. 5जी टेक्नॉलॉजी फक्त मोबाईल फोन पर्यंत मर्यादित असणार नाही तर बल्ब, पंखा, फ्रिज आणि कार देखील 5जीशी कनेक्टड राहतील. 5G मध्ये IOT वर मोठं काम होईल आणि या टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सर्व अप्लायंस व डिवाइसना एकमेकांशी जोडले जातील. दुसऱ्या शहरात जाऊन देखील तुम्ही तुमच्या घरातील डिवाइसना तुमच्या स्मार्टफोनवरून कमांड देऊ शकाल. म्हणजे मुंबईत बसून तुम्ही तुमच्या पुण्यातील घराचा बल्ब ऑन करू शकाल. 5जीच्या माध्यमातून हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, कारखाने, मॉल, एयरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि हॉटेल सारख्या ठिकाणी सर्व सिस्टम एकमेकांशी कनेक्टड राहतील. मोबाईल इंटरनेट स्पीड पाहता, काही मिनिटांत 1जीबी पर्यंतची मुव्ही डाउनलोड होईल.

कधी आहे 5जी लिलाव आणि तयारी कशी सुरु आहे

भारतात 5G स्पेक्ट्रमचा या महिन्याच्या 26 जुलैला होणार आहे. या लिलावात मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जियो, सुनील भारती कंपनी एयरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या कंपन्या सहभागी होतील. तसेच गौतम अदानी यांची कंपनी देखील यावेळी लिलावात सहभागी होणार आहे. कंपनी टेलीकॉम सर्व्हिसच्या ऐवजी 5जी स्पेक्ट्रमचा वापर पोर्ट आणि कोल माईन इत्यादींसाठी करणार असल्याचं अदानी ग्रुपनं सांगितलं आहे. 5G ऑक्शनमध्ये काही फ्रीक्वेंसी बँडसाठी आक्रामक बोली लागण्याची शक्यता आहे. तसेच कंपन्या आपला अर्ज 19 जुलै पर्यंत मागे घेऊ शकतात.

भारतात कधी सुरु होईल 5जी सर्व्हिस

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान कार्यालय म्हणजे पीएमओनं दूरसंचार विभागाला सांगितलं आहे की ते 15 ऑगस्ट पर्यंत देशात 5जी टेलीकॉम सेवा लाँच करू इच्छित आहेत. तसेच यंदाच्या बजेटमध्ये देखील 2022-23 मध्ये 5जी सेवा लाँच करण्याचा उल्लेख आला होता. त्यामुळे पंतप्रधान 15 ऑगस्टला या सर्व्हिसच्या लाँचची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.

या 13 शहरांमध्ये सर्वप्रथम मिळेल 5G सर्व्हिस

लिलाव आणि लाँचनंतर सुरुवातील फक्त काही 13 निवडक शहरांमध्ये 5G सर्व्हिस मिळेल अशी माहिती यावर्षी डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशंस (DoT) नं दिली होती. 2022 मध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंढीगढ, गांधीनगर, गुरुग्राम, हैद्राबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस मिळेल. परंतु डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशननं ऑफिशियली सांगतील नाही की कोणती टेलीकॉम ऑपरेटर देशात 5जी सर्व्हिस कमर्शियली सर्वप्रथम रोल आउट करेल. तसेच देशातील तिन्ही प्रमुख टेलीकॉम कंपन्या रिलायन्स जियो, एयरटेल आणि वोडाफोन आयडिया यांनी या शहरांमध्ये आपली टेस्टिंग पूर्ण केली आहे.

ही कंपनी लाँच करेल भारतात सर्वप्रथम 5G

रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानींनी विश्वास व्यक्त केला होता की, 5जीची सुरुवात रिलायन्स जियोच करेल. रिलायन्स जियो अत्याधुनिक स्टॅन्डअलोन 5G टेक्नॉलॉजी विकसित करण्याच्या बाबतीत पुढे आहे. मुकेश अंबानींनी सांगितलं होतं की 5जी टेस्टिंगमध्ये जियोनं यशस्वीरीत्या 1GBPS पेक्षा जास्त स्पीड मिळवला होता. जियोचं ‘मेड इन इंडिया’ सोल्युशन जागतिक दर्जाचं असल्याचं मुकेश अंबानींनी सांगितलं आहे. जियोची 5जी लाँचिंग गुगलच्या भागेदारीसह केली जात आहे. जियो 5जीसाठी गुगल क्लाउडचा वापर केला जाईल.

5G सिम कसे मिळेल

आगामी 5G Network साठी सर्व टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना नवीन सिम कार्ड देतील, हे स्पष्ट आहे. हे 5G SIM Card मौजूदा 4जी सिम कार्डपेक्षा वेगळं असू शकतं. परंतु अजून कोणतीही अधिकृत माहिती आली नाही. परंतु काही रिपोर्ट्सनुसार 5जी नेटवर्क अ‍ॅक्सेस करण्यासाठी कोणत्याही नवीन सिम कार्डची गरज नाही. 5जी स्मार्टफोनमध्ये 4जी सिमवरून 5जी नेटवर्क अ‍ॅक्सेस करता येईल. काही कंपन्यांनी आधीच 5G रेडी सिम देखील ग्राहकांना दिले आहेत.

5जी सिमवरून 4जी फोनमध्ये मिळेल 5जी सर्व्हिस?

5G सर्व्हिस अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला 5G स्मार्टफोन विकत घ्यावा लागेल, हे मात्र स्पष्ट आहे. अन्यथा 5G नेटवर्क उपलब्ध होणार नाही. तसेच 5जी मोबाईल फोनमध्ये 5जी सह 4जी, 3जी आणि 2जी नेटवर्कचा देखील वापर करता येईल. परंतु 4जी फोनमध्ये 5जी नेटवर्कचा वापर करता येणार नाही.

किती असेल 5जीची किंमत

5जी सर्व्हिसच्या प्राईस बद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत. काहींच्या मते, सुरुवातीला सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असेल तर काहींच्या मते स्पर्धात्मक दर ठरवले जातील. अलीकडेच टेलीकॉम मंत्र्यांनी म्हटलं होतं की भारतात 5जीची प्राईस जगात सर्वात कमी असेल. मनाला दिलासा देणारी जरी ही बातमी असली तरी एक्सपर्टच्या मते 5G सध्या असलेल्या 4जीपेक्षा खूप महाग असेल.

याचे संकेत काही महिन्यांपूर्वी एयरटेलचे सीईओ सुनील भारती मित्तल यांच्या विधानातून मिळाले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतात एआरपीयू म्हणजे अ‍ॅव्हरेज रेवेन्यू पर युजर खूप कमी म्हणजे जवळपास 150 रुपये आहे आणि तो 600 रुपयांच्या आसपास आला पाहिजे आणि त्यासाठी 5जी सर्व्हिसचा वापर केला जाईल. इतकेच नव्हे तर लिलावात गेलेली रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न टेलिकॉम कंपन्या सुरुवातीला करतीलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here