दोन दिवस चार्जिंगविना वापरता येणारा फोन! 6000mAh ची दणकट बॅटरी असलेल्या स्मार्टफोनवर दमदार सूट

SAMSUNG नं काही महिन्यांपूर्वी आपला एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन 6000mAh च्या दमदार बॅटरीसह सादर केला होता. आता हा बिग बॅटरी स्मार्टफोन SAMSUNG Galaxy F13 स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून स्वस्तात विकत घेता येत आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4GB रॅमसह लाँच करण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फोन बजेट सेगमेंटमध्ये पावरफुल फीचर्ससह उतरवण्यात आला आहे. आता फोनची खरेदी HDFC किंवा ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे केल्यास 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. पुढे आम्ही तुम्हाला SAMSUNG Galaxy F13 स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डील आणि ऑफर्ससह फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

SAMSUNG Galaxy F13 वरील ऑफर्स

SAMSUNG Galaxy F13 स्मार्टफोनचा बेस व्हेरिएटन फ्लिपकार्टवर 11,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन विकत घेताना ICICI बँक आणि HDFC बँकेच्या कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे सॅमसंगचा हा दमदार स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंगचा गॅलेक्सी एफ सीरीजचा हा मॉडेल दोन व्हेरिएंटमध्ये भारतीयांच्या भेटीला आला आहे. या फोनचा 4GB रॅम व 64GB स्टोरेज असलेला हा बेस व्हेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर दुसऱ्या दुसरा व्हेरिएंट 4GB रॅम व 128GB इंटर्नल स्टोरेज मिळते, ज्याची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. आता हे दोन्ही मॉडेल वरील डिस्काउंटसह विकत घेता येतील.

Samsung Galaxy F13 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6-इंच FHD+ डिस्प्ले
  • Exynos 850 प्रोसेसर
  • 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज
  • Android 12 OS बेस्ड OneUI 4.1
  • 50MP कॅमेरा
  • 6,000mAh बॅटरी

Samsung Galaxy F13 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full-HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप स्टायल नॉच देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F13 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे, सोबत 5MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. स्मार्टफोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीचा Exynos 850 प्रोसेसर मिळतो. त्याचबरोबर सॅमसंगच्या या फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Mali G52 देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फोन 4GB RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह बाजारात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे. या फोनमध्ये Android 12 आधारित OneUI 4.0 कस्टम स्किन देण्यात आली आहे.

सॅमसंगच्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सुरक्षेची काळजी घेतो. फोनची सर्वात मोठी खासियत यातील 6000mAh ची अवाढव्य बॅटरी, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here