टेक्नोने अलीकडेच ग्लोबल मार्केटमध्ये आपल्या ‘स्पार्क’ सीरीज अंतर्गत Spark 30C स्मार्टफोन सादर केला आहे. तसेच आता कंपनी या सीरीज अंतर्गत Tecno Spark 30 4G फोन पण घेऊन येत आहे ज्याचा प्रोमोशनल फोटो आणि स्पेसिफिकेशन कंपनी घोषणा होण्याच्या आधी इंटरनेटवर लीक झाली आहे. टेक्नो स्पार्क 30 4 जी स्मार्टफोन येत्या काही दिवसांमध्ये लाँच होईल, मात्र त्याच्या आधी तुम्ही याची किंमत, लूक आणि फिचर्सची माहिती पुढे वाचू शकता.
Tecno Spark 30 4G ची किंमत (लीक)
सर्वप्रथम फोन किंमत बद्दल बोलायचे झाले तर टेक्नो स्पार्क 30 4 जी फोनला लो बजेट सेग्मेंटमध्ये आणले जाईल. रिपोर्टनुसार या मोबाईलची किंमत 10,000 रुपये कमी ठेवली जाईल. सध्या भारतातील किंमतीची माहिती समोर आली नाही, मात्र आशा करू शकता की सुरुवाती किंमत 9,499 रुपयांच्या आसपास मिळू शकते.
Tecno Spark 30 4G चा फोटो (लीक)
Tecno Spark 30 4G चे स्पेसिफिकेशन (लीक)
- 6.78-इंचाची 90 हर्ट्स एचडी+ स्क्रीन
- मीडियाटेक हीलियो जी 91 प्रोसेसर
- 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
- 64 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
- 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 18 वॉट 5,000 एमएएच बॅटरी
डिस्प्ले : रिपोर्टनुसार टेक्नो स्पार्क 30 4 जी फोनला 1080 x 2460 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.78-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच केले जाईल. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे, जी 90 हर्ट्स रिफ्रेश रेटवर काम करेल.
प्रोसेसर : Tecno Spark 30 4G ला अँड्रॉईड 14 आधारित हायओएसवर सादर केले जाईल. लीकनुसार हा मोबाईल MediaTek Helio G91 चिपसेटवर काम करेल. हा प्रोसेसर 2 गीगाहर्ट्स पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करू शकतो.
मेमरी : समोर आलेल्या माहितीनुसार टेक्नो स्पार्क 30 4 जी फोन 8GB RAM वर लाँच होईल. फोनमध्ये वचुर्अल रॅम पण पाहायला मिळू शकते. तसेच स्टोरेज पर्याय पाहता याला 128GB आणि 256GB मेमरी सह मार्केटमध्ये आणले जाऊ शकते. तसेच यात 1TB मेमरी कार्डला सपोर्ट पण मिळू शकतो.
कॅमेरा : टेक्नो स्पार्क 30 4 जी स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर AI लेन्स सह 64 मेगापिक्सल मेन सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या मोबाईलमध्ये 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा पाहायला मिळू शकतो.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी Tecno Spark 30 4G स्मार्टफोनला 5,000mAh battery सह केले जाऊ शकते. समोर आलेल्या रिपोर्टनुसार हा टेक्नो फोन 18W fast charging टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल ज्यामुळे यूएसबी टाईप सी पोर्ट सह वापर केला जाईल.
टेक्नो स्पार्क 30 सीरीज अजून भारतात लाँच नाही झाली. परंतु जर तुम्ही कोणताही नवीन टेक्नो मोबाईल खरेदी करणार आहात तर 6 सप्टेंबरला लाँच झालेला Tecno Pova 6 Neo 5G फोन तुमच्या कामी येऊ शकतो. याची किंमत आणि स्पेफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Tecno Pova 6 Neo 5G ची किंमत
- 6GB RAM + 128GB Memory – 12,999 रुपये
- 8GB RAM + 256GB Memory – 13,999 रुपये
टेक्नो पोवा 6 नियो 5 जी फोन दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. याच्या बेस मॉडेलमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे ज्याची किंमत 12,999 रुपये आहे. तसेच मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 256 जीबी मेमोरीला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 13,999 रुपये आहे. या नवीन टेक्नो मोबाईलला Midnight Shadow, Azure Sky आणि Aurora Cloud कलरमध्ये विकत घेता येईल.
Tecno Pova 6 Neo 5G चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले
Tecno POVA 6 Neo 5जी फोन 720 × 1600 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67-इंचाच्या एचडीप्लस डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही आयपीएस एलसीडी स्क्रीन आहे ज्यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 480nits ब्राईटनेस मिळते.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी टेक्नो पोवा 6 नियो 5 जी फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एलइडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सल सेन्सर देण्यात आला आहे जो एआय लेन्ससह मिळून चालतो. या स्मार्टफोनमध्ये 3 एक्स लॉसलेस इन सेन्सर झूम पण मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी नवीन टेक्नो मोबाईलमध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
प्रोसेसर
टेक्नो पोवा 6 नियो 5 जी स्मार्टफोन 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डायमेंसिटी 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो जो 2.4 गीगाहर्ट्स पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. 91 मोबाईलच्या टेस्टिंग मध्ये हा फोन 443163 AnTuTu स्कोर मिळवला आहे.
बॅटरी
पावर बॅकअपसाठी Tecno Pova 6 Neo मध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे तसेच याला चार्ज करण्यासाठी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते. 91 मोबाईलच्या टेस्टमध्ये याने 11 तास 46 मिनिटे पीसीमार्क बॅटरी स्कोर प्राप्त केला आहे. हा फोन 86 मिनिटामध्ये 20% ते 100% फुल चार्ज होतो.















