एक नंबर! परवडणाऱ्या किंमतीत OnePlus चा 5G Phone; 64MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट

एकेकाळी फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणारी वनप्लस कंपनी सध्या मिडरेंज स्मार्टफोन देखील सादर करत आहे. वनप्लसच्या अशाच एका बजेट 5G स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 Lite 5G वर अ‍ॅमेझॉन दमदार डिस्काउंट देत आहे. या वनप्लस स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यात 64MP चा प्रायमरी रियर कॅमेरा मिळतो. वनप्लसचा हा स्मार्टफोन 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. पुढे आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डिस्काउंट, ऑफरची सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला वनप्लसच्या स्वस्त 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सची माहिती देखील देत आहोत.

OnePlus Nord CE 2 Lite 5G वरील ऑफर

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर 18,999 रुपयांची किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. वनप्लसच्या या फोनवर अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्ड धारकांना 1000 रुपयांची सूट मिळेल. हा डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्हाला 16,149 रुपयांची खरेदी करावी लागेल. म्हणजे जर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज करणार असाल तर तुमची कार्ट व्हॅल्यू यापेक्षा कमी होणार नाही, याची काळजी घ्या. बँक डिस्काउंटसह वनप्लसचा हा फोन 17,999 रुपयांमध्ये घरी घेऊन येत येईल. हा फोन अ‍ॅमेझॉनवर EMI वर देखील विकत घेता येईल.हे देखील वाचा: iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार

OnePlus Nord CE 2 Lite 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nord CE 2 Lite 5G मध्ये 6.59-इंच IPS LCD फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसर पाहता या फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन 695 SoC चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS पाहता हा फोन अँड्रॉइड 12 आउट ऑफ द बॉक्स आधारित ऑक्सीजनओएस 12.1 वर चालतो.

Nord CE 2 Lite 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात f/1.7 अपर्चर असलेला 64MP ची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स आणि 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा लेन्स मिळते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला धोबीपछाड देणार! OnePlus Nord 3 आणि Nord Watch येतायत भारतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here