16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • iQOO Z7 5G भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये विकला जाईल.
  • 8जीबी एक्सपांडेबल रॅमसह तत् 16जीबी रॅमची पावर मिळते.
  • हा आयकू फोन मीडियाटेक डिमेनसिटी 920 वर चालतो.

iQOO Z7 5G आज भारतात लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 5जी कनेक्टिव्हिटीसह आला आहे जो मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेटवर चालतो. हा फोन 8जीबी एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे यात 16जीबी रॅम पर्यंतची परफॉर्मन्स मिळते. तसेच 64 मेगापिक्सल कॅमेरा या फोनची मोठी खासियत आहे. पुढे तुम्ही आयकू झेड7 5जी फोनची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

आयकू झेड7 5जीची किंमत

iQOO Z7 5G दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 18,999 रुपये आहे. तसेच मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 19,999 रुपये आहे. हा मोबाइल फोन Pacific Night आणि Norway Blue कलरमध्ये शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. विशेष म्हणजे HDFC आणि SBI कार्ड युजर्सना 1500 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळेल. हे देखील वाचा: 11,999 रुपयांमध्ये 8GB RAM; Moto G32 भारतात लाँच, 22 मार्चपासून सुरु होईल विक्री

आयकू झेड7 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.38″ FHD+ AMOLED Display
  • MediaTek Dimensity 920
  • 8GB RAM+8GB RAM = 16GB RAM
  • 64MP Rear Camera
  • 44W 4,500mAh Battery

iQOO Z7 स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.38 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसहवर लाँच झाला आहे. ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. कंपनीनं आपल्या या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी दिली आहे.

आयकू झेड7 अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो फनटच ओएस 13 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.5गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालणारा मीडियाटेक डिमेनसिटी 920 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी68 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन 8जीबी एक्सपांडेबल रॅमला सपोर्ट करतो ज्यामुळे आयकू झेड7 16जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो.

फोटोग्राफीसाठी iQOO Z7 5G फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो ओआयएस फीचरसह येतो. तसेच हा मोबाइल फोन एफ/2.4 अपर्चर असेलेल्या 2 मेगापिक्सलच्या बोका लेन्सला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आयकू झेड7 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेली 16 मेगापिक्सलची फ्रंट लेन्स देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

iQOO Z7 5G ड्युअल सिम फोन आहे ज्यात 5जी आणि 4जी दोन्ही सिम वापरता येतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. मोबाइलची बॅटरी फक्त 25 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. हा फोन आयपी54 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्टप्रूफ बनतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here