64MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M32 Prime Edition भारतात लाँच

64mp camera phone Samsung Galaxy M32 Prime Edition launched check price specifications sale offer

Samsung नं दिवाळीच्या निमित्ताने भारतीय बाजारात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन सॅमसंग मोबाइल फोन Samsung Galaxy M32 Prime Edition भारतात लाँच झाला आहे. हा सॅमसंग स्मार्टफोन दिवाळी ऑफरसह 10,999 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध झाला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन 64MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G80 चिपसेट आणि 6,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो, ज्याची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M32 Prime Edition

सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही सुपर अ‍ॅमोलेड स्क्रीन आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. सॅमसंगनं याला इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले असं नाव दिलं आहे. हा सॅमसंग मोबाइल स्क्रीन 800 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो तसेच याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Best Cricket Games: घर बसल्या सहभागी व्हा T20 च्या युद्धात; मोबाइलवर खेळ हे क्रिकेटचे शानदार गेम

64mp camera phone Samsung Galaxy M32 Prime Edition launched check price specifications sale offer

Samsung Galaxy M32 Prime Edition क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढ्याच अपर्चरचा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

64mp camera phone Samsung Galaxy M32 Prime Edition launched check price specifications sale offer

सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसेरसह मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. हा सॅमसंग स्मार्टफोन 6 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्यात 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो.

64mp camera phone Samsung Galaxy M32 Prime Edition launched check price specifications sale offer

Samsung Galaxy M32 Prime Edition 4जी फोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो. या मोबाइल फोनमध्ये 3.5एमएम जॅक सोबतच बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: चार्जिंगला लावताच हॅक होऊ शकतो तुमचा फोन; जाणून घ्या ‘ज्यूस जॅकिंग’ म्हणजे काय

64mp camera phone Samsung Galaxy M32 Prime Edition launched check price specifications sale offer

Samsung Galaxy M32 Prime Edition Price

सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Samsung Galaxy M32 Prime चा 4जीबी रॅम व्हेरिएंट 11,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे तर 6जीबी रॅम व्हेरिएंटची प्राइस 13,499 रुपये आहे. अ‍ॅमेझॉन इंडियावर सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन खरेदी केल्यास 500 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळत आहे त्यामुळे या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे : 10,999 रुपये आणि 12,999 रुपये होते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here