चार्जिंगला लावताच हॅक होऊ शकतो तुमचा फोन; जाणून घ्या ‘ज्यूस जॅकिंग’ म्हणजे काय

आपल्या फोनची बॅटरी कायम फुल असावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. घरातून बाहेत पडल्यावर तर लो बॅटरी लो होण्याची जास्त भीती असते. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मॉल, ऑफिस इत्यादी ठिकाणी जिथे चार्जिंग पोर्ट दिसतो तिथे आपण USB केबल घसवून आपला फोन चार्ज करू लागतो. परंतु तुम्हाला माहित आहे का कोणत्याही पोर्टमध्ये यूएसबी लावून फोन चार्ज करणं खूप धोकादायक ठरू शकतं आणि हॅकर्स तुमच्या फोनचा डेटा चोरू शकतात.

Juice Jacking Fraud

USB Cable फक्त चार्जिंगच्या कामी येत नाही तर फोनचा डेटा ट्रांसफर देखील करता येतो, हे तुम्हाला देखील माहित आहे. परंतु तुम्हाला हे माहित नसेल की जेव्हा तुम्ही फोन चार्ज करत असता तेव्हा हॅकर्स तुमच्या फोनचा डेटा देखील कॉपी करतात. डेटा चोरीच्या या टेक्नॉलॉजीला Juice Jacking Fraud असं नाव देण्यात आलं आहे. अशा हॅकिंगमध्ये यूएसबी केबलच्या माध्यमातून फोनचा डेटा चोरला जातो आणि युजर्सना कळत देखील नाही. या जबरदस्त स्कॅम बद्दल ओरिसा पोलिसांनी चेतावणी दिली आहे.

what is juice jacking fraud how to protect your phone know details

अशी होते डेटाची चोरी

वर सांगितल्याप्रमाणे यूएसबी केबल चार्जिंग आणि डेटा ट्रांसफरचं काम करते. ज्यूस जॅकिंग फ्रॉडमध्ये यूएसबी केबलच्या या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. सार्वजनिक ठिकाणी यूएसबी पोर्ट्स हॅकर्स टॅम्पर करत आहेत, म्हणजे पोर्टमध्ये छेडछाड करून आपलं डिवायस कनेक्ट करतात. आणि जेव्हा एखादी व्यक्ती या पोर्टमध्ये आपला फोन चार्ज करण्यासाठी लावतो तेव्हा हॅकर्स फोनचा सर्व डेटा देखील कॉपी करतात. यात फोनच्या कॉन्टेक्ट लिस्ट आणि फोटो गॅलरीसह सर्व फाईल्स व व्हॉट्सअ‍ॅप चॅट इत्यादीचा समावेश असतो. युजर्स आपला फोन चार्ज करत असतात आणि हॅकर्स सर्व डेटा चोरी करतात.

मोबाइल हॅकपासून कसं वाचायचं

-> सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, एयरपोर्ट, मॉल, सिनेमा हॉल, हॉस्पिटल किंवा अनोळखी ऑफिसच्या जागी चार्जिंग पोर्टचा वापर करू नका.
-> जर अशा पोर्ट्समध्ये तुमचा फोन कनेक्ट करावा लागला तर मोबाइल ऑफ करून चार्ज करा.

what is juice jacking fraud how to protect your phone know details

-> जर फोन चार्जिंग दरम्यान ऑन ठेवावा लागत असेल तर कमीत कमी फोनचा डेटा ट्रांसफर बंद करा.
-> जर पावर प्लग असेल तर तुमच्या चार्जिंग अ‍ॅडॅप्टरच्या माध्यमातून फोन चार्ज करा, डायरेक्ट USB सॉकेटमध्ये केबल लावू नका.

what is juice jacking fraud how to protect your phone know details

या स्टेप्स पूर्णपणे तुमचा बचाव करतीलच असं नाही. त्यामुळे सर्वात पहिला पॉईंट म्हणजे सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग न करणे हा चांगला उपाय आहे. शक्य असल्यास्त सोबत पावर बँक बाळगा जेणेकरून मोठ्या प्रवासात फोन पावर बँकनं चार्ज करता येईल. तसेच फोन व टॅबलेट डिवायसमध्ये अँटीव्हायरस असेल तर अ‍ॅक्टिव्ह ठेवावं, ज्यामुळे अनेक मालवेयर्सपासून बचाव होतो.

what is juice jacking fraud how to protect your phone know details

80,000 रुपयांचे नुकसान

काही दिवसांपूर्वी अमित मिश्रा नावाचा एक व्यक्ती Juice Jacking Fraud ला बळी पडला. फोनची बॅटरी कमी असल्यामुळे या व्यक्तीनं एयरपोर्टवरील USB बॅटरी चार्जिंग स्टेशनमध्ये फोन चार्ज केला होता. फोन चार्ज केल्यानंतर काही तासांनी या व्यक्तीला SMS मिळाला ज्यात सांगण्यात आले होते की त्याच्या बँक अकाऊंटमधून 80,000 रुपये डेबिट झाले आहेत. हा कारनामा हॅकर्सनं त्याचा यूएसबी पोर्टच्या माध्यमातून फोन डेटा चोरून केला होता, ज्यात अमितचे बँकिंग डिटेल देखील होते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here