OPPO Reno 12 series ची पुढील महिन्यात होऊ शकते एंट्री, लाँच टाईमलाईन झाली लीक

OPPO Reno 11 आणि Reno 11 Pro जानेवारी 2024 मध्ये भारतात लाँच झाले होते ज्याची किंमत क्रमश: 27,999 रुपये तसेच 39,999 रुपयांपासून सुरु होते. कॅमेऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या मोबाईल फोननंतर आता कंपनी ‘रेनो 12 सीरिज’ आणण्याच्या तयारी मध्ये आहे. एका नवीन लीकमध्ये OPPO Reno 12 series ची लाँच टाईमलाईन पण समोर आली आहे ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

OPPO Reno 12 series लाँच टाईमलाईन

ओप्पो रेनो 12 सीरिज हे लीक चीनमध्ये समोर आले आहे. चीनी मायक्रोब्लागिंग साईट वेईबोवर स्मार्ट पिकाचू नावाच्या एका टिपस्टरने लिहिले आहे की ओप्पो अपनी नवीन रेनो सीरिज मे 2024 मध्ये चीनमध्ये लाँच होऊ शकते. सध्या कोणतीही लाँचची तारिख समोर आलेली नाही, परंतु लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की पुढील महिन्यात ही OPPO Reno 12 आणि OPPO Reno 12 Pro चीनमध्ये लाँच होऊ शकते.

OPPO Reno 12 series स्पेसिफिकेशन (लीक)

  • 6.7″ 1.5K 120Hz Display
  • MediaTek Dimensity 9200
  • 50MP Selfie Camera
  • 50MP Dual Rear Camera
  • 80W Fast Charging (Reno 12 Pro)
  • 67W Fast Charging (Reno 12)
  • 5,000mAh Battery

स्क्रीन : ओप्पो रेनो 12 सीरिजला 6.7 इंचाच्या मोठ्या स्क्रीनवर लाँच केले जाऊ शकते. लीकनुसार हा पंच-होल स्टाईल डिस्प्ले असेल जो 1.5 के ​रेजोल्यूशनला सपोर्ट करेल तसेच 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करेल.

प्रोसेसर : लीकनुसार Reno 12 स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंसिटी 9200 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच होईल. अपेक्षा आहे की ही चिपसेट सीरिजच्या प्रो मॉडेलमध्ये पण पाहायला मिळू शकते.

कॅमेरा : सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी रेनो 12 तसेच 12 प्रो मध्ये 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो.

बॅटरी : लीकनुसार Reno 12 Pro 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच Reno 12 मध्ये 67 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. पावर बॅकअपसाठी या दोन्ही फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here