Vivo Y38 5G लवकर होऊ शकतो लाँच, सर्टिफिकेशन साईटवर समोर आले स्पेसिफिकेशन

विवो च्या 5G स्मार्टफोन प्रोडक्ट पोर्टफोलियोमध्ये नवीन Vivo Y38 5G जोडला जाणार आहे. डिव्हाईसला याआधी ब्लूटूथ एसआयजी, CQC, बेंचमार्किंग साईट गीकबेंच सारख्या काही प्लॅटफॉर्मवर पाहिले गेले आहे. तसेच, आता हा मोबाईल IMDA आणि एनसीसी सर्टिफिकेशन वेबसाईटवर समोर आला आहे. ज्यात पावरफुल स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. चला, दोन्ही लिस्टिंगची माहिती जाणून घेऊया.

Vivo Y38 5G IMDA आणि एनसीसी लिस्टिंग

  • Vivo Y38 5G फोन V2343 मॉडेल नंबरसह IMDA आणि NCC सर्टिफिकेशनवर दिसला आहे.
  • IMDA प्लॅटफॉर्मवर कंफर्म झाले आहे की मोबाईलमध्ये NFC ला सपोर्टसह 5G कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच 8 5 जी बँड्स मिळण्याची चर्चा आहे.
  • NCC लिस्टिंग पाहता Vivo Y38 5G चे फोटो पण समोर आले आहेत. ज्यात फोनमध्ये पंच-होल डिस्प्लेसह राऊड एज आहेत.
  • डिव्हाईसच्या रिअर पॅनलवर गोल मॉड्यूल आहे, यात एलईडी फ्लॅशसह दोन सेन्सर मिळू शकतात. तसेच फोनमध्ये ब्रँडची ‘ऑरा लाइट’ टेक्नॉलॉजी पण पाहायला मिळाली आहे.
  • यूएसबी टाईप-सी पोर्ट, हेडफोन जॅक आणि स्पिकर ग्रिल खाली दिसून येत आहेत. तर उजव्या साईडवर वॉल्यूम आणि पावर बटन आहेत.
  • Vivo Y38 5G मध्ये 44W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 6000mAh ची बॅटरी असणार आहे.
  • स्टोरेजच्या बाबतीत स्मार्टफोन 8GB रॅम + 128GB आणि 256GB स्टोरेज असलेला सांगण्यात आले आहे. हेच नाही तर स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट पण दिला जाऊ शकतो.

Vivo Y38 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: Vivo Y38 5G फोनच्या डिस्प्ले साईजची माहिती मिळालेली नाही, परंतु यात पंच होल डिझाईनसह FHD+ स्क्रीन मिळू शकते.
  • प्रोसेसर: गीकबेंच लिस्टिंगनुसार Vivo Y38 5G मध्ये युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट दिली जाऊ शकते.
  • मेमोरी: डेटा स्टोर करण्यासाठी हा डिव्हाईस 8GB पर्यंत रॅम +256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप LED सह लावला जाऊ शकतो. परंतु अजून लेन्सबद्दल माहिती मिळाली नाही.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत डिव्हाईसमध्ये 6000mAh ची बॅटरी आणि 44 वॉट फास्ट चार्जिंगसह मिळू शकते.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता Vivo Y38 5G ला अँड्रॉईड 14 वर आधारित ठेवले जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here