रियलमीने भारतीय बाजारात आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोला वाढवित नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने हा मोबाईल ‘नारजो’ सीरीजमध्ये जोडला आहे जो Realme Narzo N61 नावाने लाँच झाला आहे. ArmorShell प्रोटेक्शनसह आहे हा फोन 6GB फिजिकल रॅम आणि 6GB वचुर्अल रॅमसह 12GB RAM ची ताकद मिळते. रियलमी नारजो एन 61 ची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Realme Narzo N61 ची किंमत
- 4GB RAM + 64GB Storage = ₹7,499
- 6GB RAM + 128GB Storage = ₹8,499
रियलमी नारजो एन 61 दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. मोबाईलच्या बेस मॉडेलमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी मेमोरीला सपोर्ट करतो. या दोन्हीची किंमत 7,499 रुपये आणि 8,499 रुपये आहे. सुरुवाती सेलमध्ये कंपनी यावर 500 रुपयांचा डिस्काऊंट देईल, ज्याच्यानंतर फोनची किंमत क्रमश: 6,999 आणि 7,999 रुपये असेल. Narzo N61 ला Voyage Blue आणि Marble Black कलरमध्ये 6 ऑगस्टपासून विकत घेता येईल.
Realme Narzo N61 चे स्पेसिफिकेशन
- 6.74″ एचडी+ 90 हर्ट्स डिस्प्ले
- 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी
- 6 जीबी डायनॉमिक रॅम
- यूनिसोक टी 612 प्रोसेसर
- 32 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
- 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 10 वॉट 5,000 एमएएच बॅटरी
डिस्प्ले : Realme Narzo N61 मध्ये 1600 x 720 पिक्सल रेजोल्यूशन असणारी 6.74 इंचाची एचडी+ वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन देण्यात आली आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट सोबत 560nits पिक ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
प्रोसेसर : नारजो एन 61 4 जी स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो रियमली युआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये 1.8 गीगाहर्ट्स क्लॉक स्पीडवर रन करणारा UNISOC T612 आक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली-जी 57 जीपीयू आहे.
मेमरी : Narzo N61 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमला दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये 6GB Dynamic RAM टेक्नॉलॉजी आहे जी फिजिकल रॅमसह मिळून याला 12 जीबी पर्यंतची रॅम पावर देते. तसेच हा रियलमी स्मार्टफोन 2TB च्या मेमरी कार्डला सपोर्ट करतो.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Realme Narzo N61 मध्ये 32MP Super Clear Camera देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर उपलब्ध हा सेन्सर एफ/1.8 अपर्चरवर चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी नारजो एन 61 4 जी फोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट तसेच 10 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते.
इतर फिचर्स : रियलमी नारजो एन 61 AI Boost Engine सह आहे. यात 3.5mm हेडफोन जॅक आणि IP54 प्रोटेक्शन सोबत Bluetooth 5.0 आणि 5GHz Wi-Fi टेक्नॉलॉजी पण मिळत आहे.















