सॅमसंग ने केली 4 रियर कॅमेरे असलेल्या फोनची घोषणा, 11 ऑक्टोबरला होईल लॉन्च

सॅमसंग ने गेल्या महिन्यात आपला सर्वात दमदार डिवाईस गॅलेक्सी नोट 9 लॉन्च केला आहे. हा फोन भारतात 67,900 रुपयांच्या बेस किंमतीत सेल साठी उपलब्ध झाला आहे. सॅमसंग टेक जगातील त्या निवडक कंपन्यांपैकी एक आहे जी आपली टेक्नोलॉजी व डिवाइसेज ठरलेल्या वेळीच लॉन्च करते. पण यावेळी सॅमसंग काही नवीन आणि वेगळे करणार आहे. सॅमसंग पहिल्यांदाच 4 रियर कॅमेरे असलेला फोन लॉन्च करणार आहे. सॅमसंग येत्या 11 ऑक्टोबरला हा फोन जगासमोर ठेवेल आणि या नवीन स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर 4 ​कॅमेरा सेंसर असतील.

सॅमसंग मोबाईल ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून आपल्या या नवीन स्मार्टफोन ची माहिती दिली आहे. सॅमसंग ने एक ईमेज पोस्ट शेयर केली आहे ज्यावर ‘4एक्स फन’ लिहिण्यात आले आहे. सॅमसंग ने या लॉन्च ईवेंटला ‘ए गॅलेक्सी ईवेंट’ नाव दिले आहे. कंपनी ने गॅलेक्सी ईवेंट ची तारीख 11 ऑक्टोबर ठेवली आहे. सैमसंग ने आपल्या या आगामी डिवाईस च्या नावाची व यासंबंधीची इतर कोणतीही माहिती दिली नाही पण टेक बाजारात याची जोरात चर्चा सुरू आहे की 11 ऑक्टोबरला लॉन्च होणार्‍या फोन मध्ये 4 रियर कॅमेरा सेंसर मिळणार आहेत.

सॅमसंग च्या या आगामी डिवाईस बद्दल बोलले जात आहे की हा फोन गॅलेक्सी ए सीरीज मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पण जोवर सॅमसंग कडून काही ठोस माहिती देण्यात येत नाही तोवर या आगामी फोनचे नाव व याच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल काहीच बोलता येणार नाही. विशेष म्हणजे नोकिया पण एका नवीन फोन वर काम करत आहे आणि लीक्स मधून समोर येत आहे की नोकियाचा हा फोन 5 रियर कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला जाऊ शकतो.