हॅप्पी बर्थडे गूगल: बघा वीस वर्षांतील 20 कमाल

मनातील कोणती शंका असो वा कोणत्या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर सर्वात आधी गूगल ची मदत घेतली जाते. जगभरातील माहिती आणि बातम्या फक्त एका क्लिक वर गूगल वरून क्षणात मिळते. गल्लीतील दुकान ते अंर्तराष्ट्रीय संस्थांपर्यंतची माहिती गूगल कडे आहे. सर्वात मोठ्या सर्च इंजीन ची पदवी मिळवलेल्या गूगल ने आज म्हणजे 4 सप्टेंबरला आपली 20 वर्षं पूर्ण केली आहेत. आज गूगल चा जन्मदिवस आहे आणि गूगल ​अस्तित्वात येऊन आज 20 वर्षं पूर्ण झाली आहेत. चला बघुया गूगल संबधी काही रोचक किस्से:

गूगल आज 4 सप्टेंबरला आपला 20वा जन्मदिवस साजरा करत आहे. गूगल फक्त जगातील सर्वात मोठा सर्च इंजिन नाही तर सर्वात विश्वासार्ह ब्राउजर पण आहे. आज पासून 20 वर्षांपूर्वी 4 सप्टेंबर 1998 ला लॅरी पेज आणि सेर्जेई ​​ब्रिन नवाच्या दोन मित्रांनी गूगल ची सुरवात केली होती.

हे दोन्ही तरुण युवक कॅलिफॉनिया मधील स्टँडफॉर्ड यूनिवर्सिटी मध्ये पीएचडी चे विद्यार्थी होते. या दोन्ही मित्रांनी सुरवातीला गूगल ला फक्त एका वेबपेज च्या स्वरुपात सादर केले होते जो स्टँडफॉर्ड यूनिवर्सिटी च्या वेबसाइट वर अपलोड करण्यात आला होता.

गूगल चे सुरवातीचे नाव ‘बॅकरब’ ठेवण्यात आले होते. गूगल चा स्वतः चे डोमेन ‘गूगल डॉट कॉम’ 15 सप्टेंबर 1997 ला रजिस्ट्रर्ड झाले होते पण हे डोमेन विकत घेतल्या नंतर यावर काम 1998 मध्ये सुरू झाले होते. तुम्ही ऐकून हैराण व्हाल की आता संपूर्ण जगभरातून गूगल वर प्रत्येक सेकंदाला 40,000 पेक्षा जास्त सर्च केले जातात.

बोलले जाते की या सर्च इंजिन चे नाव गूगल गणितातील एक शब्द ‘Googol’ वरून ठेवण्यात आले होते, ज्याचा अर्थ आहे 1 नंतर 100 झीरो. गूगल च्या क्रिएटिव उपक्रमां पैकी एक एक ‘गूगल डूडल’ ची सुरवात पण 1998 मध्ये झाली होती आणि पहिले गूगल डूडल ‘​बर्निंग फेस्टिवल’ वर बनवण्यात आले होते.

तुम्हाला माहिती आहे का गूगल पण एका कंपनीचा एक भाग आहे. Alphabate Inc. गूगल ची पॅरेंट कंपनी आहे जीने साल 2015 मध्ये गूगल वर आपला अधिकार मिळवला. या अमेरिकन कंपनीचे हेडक्वॉटर कॅलिफॉर्निया मधील माउंटेन व्यू मध्ये आहे.

एका रिपोर्ट नुसार गूगल ने आता पर्यंत जवळपास 200 कंपन्या विकत घेतल्या आहेत. बोलले जाते की साल 2010 नंतर गूगल प्रत्येक महिन्याला कोणती ना कोणती नवीन कंपनी विकत घेत आहे. मार्च 2018 पर्यंत गूगल मध्ये जवळपास 85,050 एम्प्लॉइ झाले आहेत.

गूगल कडे 850 बिलियन यूएस डॉलर पेक्षा जास्तीचे मार्केट कॅपिटलिजेशन आहे. म्हणजे 6,07,45,67,50,00,000 रुपयांपेक्षा जास्त. जर हा आकडा वाचू शकलात तर जरुर कमेंट करा.

गूगल द्वारा संचालित यूट्यूब आज जगातील सर्वात मोठा वीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफार्म पैकी एक आहे. इथे जगभरातील लाखो वीडियो आहेत.

त्याचप्रमाणे साल 2005 मध्ये कंपनी ने गूगल मॅप आणि गूगल अर्थ आणून नेविगेशन चा चेहरामोहरा बदलला. आज कोणीही आपल्या फोन वरून कोणत्याही जागेचा नकाशा बघू शकतो.

गूगल स्मार्टफोन्स चे जग बदलून टाकत एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम घेऊन आली. गूगलचा पहिला ओएस तसे पाहता 23 सप्टेंबर 2008 ला आला होता पण एंडरॉयड ‘सी’ कपकेक पासून खऱ्याअर्थाने एंडरॉयड ची सुरवात झाली आहे.

स्मार्टफोन ब्रँड्सना एंडरॉयड ओएस दिल्यानंतर गूगल ने आपला स्वतःचा स्मार्टफोन गूगल पिक्सल पण सादर केला आहे. कंपनीने स्मार्टफोन च्या दोन जेनरेशन आणल्या आहेत तसेच तीसरी जेनरेशन ऑक्टोबर मध्ये लॉन्च ​केली जाईल. बोलले जात आहे की पिक्सल 3 गूगल ने स्वतः डिजाईन केला आहे.

गूगल च्या संस्थापकां बद्दल बोलायचे झाले तर लॅरी पेज आणि सर्जेई ब्रिन साठी नासा च्या हेडक्वॉटर मध्ये खास एक रनवे बनवण्यात आला आहे जिथे फक्त त्यांचाच विमान किंवा हेलीकॉप्टर उतरतात. या रनवे वर इतर कोणत्याही विमानाला उतरण्याची परवानगी नाही.

विशेष म्हणजे गूगल मध्ये 27 सप्टेंबरला अधिकृत जन्मदिवस साजरा केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here