Realme Narzo 60 5G फोन आला समोर, 8GB RAM आणि MediaTek प्रोसेसरसह लवकरच होऊ शकतो लाँच

Highlights

  • फोन गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 मिळू शकतो.
  • फोन 64 मेगापिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो.

Realme Narzo 50 सीरीज आणि Narzo N53 तसेच N55 स्मार्टफोन भारतात आल्यानंतर आता कंपनी आपल्या नारजो सीरिजमधील नवीन मोबाइल Realme Narzo 60 वर काम सुरु केलं नाही. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथून अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स समोर आली आहे. ह्या लिस्टिंगची माहिती आम्ही एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून मिळाली आहे ज्याची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.

Realme Narzo 60 गीकबेंच लिस्टिंग

  • नारजो 60 ची ही बेंचमार्क लिस्टिंग आज म्हणजे 14 जूनची आहे.
  • हा फोन Realme RMX3750 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे.
  • ह्या सिंगल-कोर मध्ये 714 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 1868 स्कोर मिळाला आहे.
  • रियलमी फोन इथे अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टमसह दाखवण्यात आला आहे.
  • ह्यात मदरबोर्ड कोडनेम k6833v1_64_k419 आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 असल्याचं बोललं जात आहे.
  • फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल ज्याची बेस फ्रिक्वेंसी 2.0गीगाहर्ट्झ असेल.
  • हा प्रोसेसर 2.20गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालेल.
  • गीकबेंचवर Realme Narzo 60 8जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे.

Realme Narzo 60 स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : रियलमी नारजो 60 स्मार्टफोन 6.43 इंचाची फुलएचडी+ स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो. हा अ‍ॅमोलेड डिस्प्ले असू शकतो ज्यात 90हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळेल.
  • परफॉर्मन्स : फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर लाँच केला जाऊ शकतो जो मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 वर चालेल. मार्केटमध्ये हा फोन 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह येऊ शकतो.
  • कॅमेरा : हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो ज्यात 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्स दिली जाऊ शकते. तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर मिळू शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच बॅटरी चार्जसाठी ह्या 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते.
  • इतर फीचर्स : फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असल्याचं लीकमधून समोर आलं आहे. तसेच रियलमी नारजो 60 मध्ये 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे ऑप्शन मिळू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here