चीनी टेक कंपनी शाओमीने आज अधिकृतपणे Redmi Note 10 सीरीजच्या लॉन्च डेटची घोषणा केली आहे. तुमच्या लक्षात असेल कि 91मोबाईल्सने यावर्षीच्या सुरुवातीला आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्टमध्ये सांगितले होते कि टेक कंपनी Xiaomi भारतात आपल्या ‘नोट’ सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे, ज्यावर आज शिक्कामोर्तब झाला आहे. Xiaomi इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात रेडमी नोट 10 सीरीज पुढल्या महिन्यात 4 मार्चला ग्लोबली लॉन्च करेल. दुसरीकडे कंपनीने ऑफिशियल इनवाइट पण पाठवायला सुरुवात केली आहे.
Redmi Note 10 सीरीज
आशा आहे कि रेडमी नोट 10 सीरीजमध्ये कंपनी Redmi Note 10 4G, Redmi Note 10 5G, Redmi Note 10 Pro 4G आणि Redmi Note 10 Pro 5G लॉन्च करेल. काही दिवसांपूर्वी Redmi Noote 10 सीरीजचा फोन कथितरित्या ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) आणि यूएस फॅडरल कम्यूनिकेशन कमिशन (FCC) सह गीकबेंचवर दिसला होता. हे देखील वाचा : या खास फीचरसह येऊ शकतो Apple चा पावरफुल iPhone 13 Pro, नवीन लीक मध्ये झाला खुलासा
किंमत
अलीकडेच एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि रेडमी नोट 10 सीरीज भारतात ‘आक्रामक’ किंमतीत लॉन्च केली जाईल. आशा आहे कि रेडमी नोट 10 सीरीज मध्ये येणारे डिवाइसेज भारतात 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर केले जाऊ शकतात.
स्पेसिफिकेशन्स
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार रेडमी नोट 10 च्या स्टॅंडर्ड मॉडेल मध्ये 120 हर्ट्ज एलसीडी डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सल क्वाड-कॅमेरा सिस्टमसह 5050mAh बॅटरी असू शकते. इतकेच नव्हे तर रेडमी नोट 10 प्रो 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजमध्ये सादर केला जाऊ शकतो. बातम्यांनुसार रेडमी नोट 10 सीरीज 4G आणि 5G मॉडेल्समध्ये येऊ शकते. हे देखील वाचा : Exclusive: आधीपेक्षा अजून स्वस्त झाला 6,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M21 स्मार्टफोन, अशी असेल नवीन किंमत
कलर ऑप्शन
कलर ऑप्शन पाहता Note 10 Pro Bronze, Blue आणि Gray कलर मध्ये लॉन्च केला जाईल. कंपनीने आतापर्यंत या सीरीजच्या फोन्सच्या फीचर्स बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण आशा आहे कि लॉन्च जवळ येताच कंपनी काही फीचर्सचा खुलासा करू शकते.















