Exclusive: आधीपेक्षा अजून स्वस्त झाला 6,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M21 स्मार्टफोन, अशी असेल नवीन किंमत

91मोबाईल्सने कालच माहिती दिली होती कि Samsung ने आपल्या फॅन्सना खूष करत Galaxy M11 च्या किंमतीत कपात केली आहे. आज अजून एक बातमी समोर आली आहे, जिच्यानुसार कंपनीने आपल्या गॅलेक्सी एम21 च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने या डिवाइसच्या दोन्ही वेरिएंट्सच्या किंमती कमी केल्या आहेत ज्या ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर लागू होतील. आम्हाला ऑफलाइन रिटेल सोर्सद्वारे एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि स्मार्टफोनचे वेरिएंट्स 1000 रुपयांनी स्वस्त किंमतीत रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येतील.

नवीन किंमत

Samsung Galaxy M21 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आतापर्यंत 13,499 रुपयांमध्ये विकला जात होता, तर रिटेल स्टोर्सवर हा वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफलाईन स्टोर्सवर फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,499 रुपये होती, पण आता फोनची किंमत कमी होऊन 14,999 रुपये झाली आहे. कंपनीच्या ऑफिशियल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सॅमसंग गॅलेक्सी एम21 चा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपये आणि 6 जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हे देखील वाचा : या खास फीचरसह येऊ शकतो Apple चा पावरफुल iPhone 13 Pro, नवीन लीक मध्ये झाला खुलासा

लुक व डिजाइन

Samsung Galaxy M21 च्या लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर गॅलेक्सी एम21 ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच वर बनला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एकीकडे तीन सेंसर्स आहेत तर दुसरीकडे फ्लॅश लाईट सह पिक्सल डिटेल्स लिहिण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ओवल शेप फिंगरप्रिंट सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M21 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. प्रोसेसिंगसाठी गॅलेक्सी एम21 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी72 जीपीयू ला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : अरे बापरे! स्मार्टफोनची विश्व बदलण्यासाठी येत आहे 100MP सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

दमदार कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M21 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5-मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस सपोर्ट सह येतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी गॅलेक्सी एम21 मध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम21 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here