Nokia ने गेल्याच महिन्यात सांगितले होते कि कंपनी एप्रिलमध्ये एक ग्लोबल ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून ब्रँडचे नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केले जातील. तर आज नोकिया इंडियाने पण या लॉन्चचा इन्वायट शेयर केला आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 8 एप्रिलला नोकिया ज्या मोठ्या ईवेंटचे आयोजन करेल त्याच्या मंचावरून नवीन नोकिया फोन भारतीय बाजारात पण घोषित केले जातील. नोकियाने या दिवशी लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत पण अशी चर्चा आहे कि 8 एप्रिलला Nokia X10, Nokia X20 आणि Nokia G10 स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. (HMD Global Nokia India Event on 8th April x20 x10 g10 might launch)
HMD Global ने लॉन्च ईवेंटची माहिती देत सांगितले आहे कि हा कार्यक्रम येत्या 8 एप्रिलला आयोजित केला जाईल जो भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा लॉन्च ईवेंट युरोपात आयोजित केला जाईल पण कंपनी भारतात पण याचे थेट प्रक्षेपण करेल. नोकियाच्या अधिकृत वेबसाइट सोबतच कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण या लॉन्च ईवेंटचा लाईव टेलीकॉस्ट होईल जो भारतीय युजर पण बघू शकतील.
लीक झाले स्पेसिफिकेशन्स
मागे समोर आलेल्या लीक्स आणि वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्सनुसार Nokia G10 6.38 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल. लीकनुसार हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च होईल आणि आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेटवर चालेल. लीकमध्ये नोकिया जी10 चा 3 जीबी रॅम वेरिएंट समोर आला होता पण आशा आहे कि कंपनी हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंटसह मार्केटमध्ये सादर करेल.
तसेच लीक्समध्ये खुलासा झाला आहे कि फोनच्या मागे क्वॉड-कॅमेरा सेटअप दिला जाईल. या सेटअपमध्ये 48MP चा प्राइमरी कॅमेरा सेंसर असेल. तसेच फोनमध्ये 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सल डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळू शकते. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.
किंमत आली समोर
लीक्समध्ये आगामी नोकिया स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच यांची किंमत पण शेयर केली गेली आहे. या लीक्सनुसार Nokia G10 ग्लोबल मार्केटमध्ये 139 यूरो मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. हि किंमत भारतीय करंसीनुसार 12,000 रुपयांच्या आसपास असेल. तसेच Nokia X10 5G ची किंमत 300 यूरो आणि Nokia X20 5G ची किंमत 350 यूरोच्या आसपास असू शकते. हि किंमत भारतीय चालनानुसार 25,900 रुपये आणि 30,000 रुपयांच्या आसपास आहे. असे असले तर ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतसाठी 8 एप्रिलची वाट बघितली जात आहे.















