5,160mAh बॅटरी आणि 64MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Poco X3, जाणून घ्या किंमत

Poco X3 NFC आज एक वर्चुअल इवेंट मध्ये अधिकृतपणे लॉन्च केला गेला आहे. लॉन्चच्या आधी Xiaomi च्या स्पिन-ऑफ ब्रँड पोकोच्या या फोन बाबत अनेक लीक व माहिती समोर येत होती, ज्यावर आज पूर्णविराम देण्यात आला आहे. पोको एक्स3 कंपनीच्या एक्स सीरीजचा पहिला फोन आहे, जो ग्लोबली सादर केला गेला आहे. चला जाणून घेऊया या फोनच्या डिजाइन, किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स बाबत.

डिजाइन

कंपनी म्हणत आहे कि पोको एक्स 3 एनएफसी ‘फिनिश लाइन’ डिजाइन वर सादर केला गेला आहे. डिवाइस छोट्या डॉट डिस्प्ले सह येतो. डिवाइसच्या बॉटमला 3.5एमएम हेडफोन जॅक, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि माइक आहे. डिवाइसच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि पावर बटन आहे. फोनचा पावर बटनच फिंगरप्रिंट सेंसरचे काम करतो. फोनच्या समोरच्या बाजूला गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तर मागे “पॉलीकार्बोनेट” पॅनल आहे. मागे एक वर्तुळाकृती कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात क्वाड कॅमेरा सेटअप सह एक एलईडी फ्लॅश आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट देण्यात आला आहे. जो क्वालकॉम क्रियो 470 सीपीयू प्राइम कोर सह येतो ज्याच्या क्लॉक स्पीड 2.3 गीगाहर्ट्ज आहे. तसेच स्मूद गेमिंगसाठी यात एड्रिनो 618 जीपीयू देण्यात आला आहे. फोन मध्ये मल्टीटास्किंगसाठी 6GB रॅम LPDDR4X आणि स्टोरेजसाठी 128GB पर्यंत UFS 2.1 स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते. पोको एक्स3 एनएफसी मध्ये हाय एफिशिएंसी लिक्विड टेक्नोलॉजी 1.0 प्लसचा वापर करण्यात आला आहे.

फोन मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ डॉट डिस्प्ले आहे. डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह सादर करण्यात आला आहे, जायचा टच सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्ज आहे. Poco X3 NFC एंडरॉयड 10 MIUI 12 वर चाललो. पोको एक्स 3 मध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली मोठी 5,160mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरी बाबत कंपनीचा दावा आहे कि एकदा चार्ज केल्यावर बॅटरी दोन दिवस चालेल. फोनची बॅटरी फुल चार्ज झाल्यावर 10 तास गेमिंग आणि 17 तास वीडियो प्लेबॅक टाइम देते.

फोन मध्ये एकूण 5 कॅमेरे देण्यात आले आहेत ज्यातील चार मागे आणि एक सेल्फीसाठी फ्रंटला आहे. डिवाइसच्या मागे असलेल्या कॅमेरा सेटअप मध्ये अपर्चर f/1.73 सह 64MP Sony IMX 682 सेंसर आहे. तसेच फोन मध्ये अपर्चर f/2.2 सह 13 मेगापिक्सलचा 119 डिग्री अल्ट्रावाइड सेंसर, अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

किंमत

Poco X3 NFC कंपनीने Shadow Gray आणि Cobalt Blue कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. डिवाइसच्या 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत€229 (जवळपास 20,000 रुपये) आणि 6जीबी व 128जीबी वेरिएंटची किंमत €269 (जवळपास 24,000 रुपये) आहे. फोनची विक्री 8 सप्टेंबरला केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here