Vivo चा एक लो बजेट स्मार्टफोन एप्रिलमध्ये गुगल प्ले कंसोलवर दिसला होता जो Vivo Y12s 2021 नावाने लिस्ट झाला होता. इथे फोनच्या अनेक मोठ्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. आता वीवोने आपला हा फोन कोणत्याही घोषणेशिवाय थेट टेक मार्केटमध्ये आणला आहे. Vivo Y12s 2021 कंपनीने वियतनाममध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये पण पदार्पण करेल. वीवो वाय12एस 2021 लो बजेट डिवायस आहे जो 5,000एमएएच बॅटरी, 3जीबी रॅम आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह क्वॉलकॉम चिपसेटला सपोर्ट करतो. (Vivo Y12s 2021 4g smartphone launched specs price sale offer)
Vivo Y12s 2021 चे स्पेसिफिकेशन्स
वीवो वाय12एस 2021 स्मार्टफोन कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला छोटी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे.
Vivo Y12s 2021 कंपनीने अँड्रॉइड 11 वर सादर केला गेला आहे जो फनटचओएस 11 सह मिळून चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट देण्यात आला आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये या फोनने 3 जीबी रॅमसह एंट्री घेतली आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
हे देखील वाचा : 15 मे नंतर WhatsApp मध्ये होतील हे मोठे बदल, Privacy Policy मान्य न केल्यास होईल मोठे नुकसान
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y12s 2021 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलवर डावीकडे वर्टिकल शेपमध्ये देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वीवो वाय12एस 2021 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.
Vivo Y12s 2021 एक 4जी फोन आहे जो डुअल सिमला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पावर बटण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 164.41 x 76.32 x 8.4 एमएम आणि वजन 191 ग्राम आहे. वियतनाममध्ये हा फोन VND 3,290,000 (जवळपास 10,400 रुपये) च्या किंमतीत लॉन्च झाला आहे.















