15 मे नंतर WhatsApp मध्ये होतील हे मोठे बदल, Privacy Policy मान्य न केल्यास होईल मोठे नुकसान

WhatsApp Privacy Policy

WhatsApp ने नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी सांगितले होते कि कंपनी भारतात आपली नवीन प्राइवेसी पॉलिसी घेऊन येणार आहे. जानेवारीच्या सुरुवातीला कंपनीने आपल्या सर्व अधिकृत प्लॅटफॉर्म सोबतच अ‍ॅपच्या स्टेटस सेक्शनमध्ये पण नवीन ‘टर्म अँड कंडिशन’ ची नोटिफिकेशन प्रकाशित केली होती. या नवीन WhatsApp Terms and Privacy Policy येत्या सोमवारी म्हणजे 15 मे पासून लागू होईल. 15 मेपासून व्हाट्सअ‍ॅपचा वापर करण्यात मोठे बदल होणार आहेत. लोकनाच्या मनात अनेक प्रश्न आहेत कि 15 मे नंतर त्यांच्या WhatsApp मध्ये नेमके काय होईल. व्हाट्सअ‍ॅप सुरु राहील कि नाही आणि वापर करता आला तर त्यासाठी पैसे द्यावे लागतील का. युजर्सच्या या प्रश्नांची उत्तरे आम्ही पुढे दिली आहेत कि 15 मे 2021 नंतर किती बदलेले तुमचा WhatsApp. (What happens when Whatsapp terms and privacy policy updates take effect after 15 May)

15 मेला बंद होणार नाही WhatsApp अकाउंट

सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि नवीन WhatsApp Privacy Policy आधी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार होती, पण पुन्हा या तारखेला पुढे ढकलण्यात आले होते. यावेळी कंपनी हि तारीख पुढे ढकलण्याचा कंपनीचा इरादा दिसत नाही. हि नवीन पॉलिसी 15 मेपासून लागू होईल. नवीन पॉलिसी लागू झाल्यानंतर कंपनी त्वरित त्या लोकांचे अकाउंट बंद करणार नाही ज्यांनी ‘टर्म अँड कंडिशन’ मान्य केल्या नाहीत. कंपनी अश्या युजर्सना अजून थोडा वेळ देईल.

WhatsApp Privacy Policy

वेळ मिळेल पण यातून कोणाचीच सुटका नाही

WhatsApp ने आपल्या नवीन प्राइवेसी पॉलिसीबाबत कडक भूमिका घेत सांगितले आहे कि हि पॉलिसी प्रत्येक युजरने मान्य करावी लागेल. 15 मेपर्यंत जे युजर हि स्वीकारणार नाहीत, त्यांना कंपनी काही आठवडे नोटिफिकेशन्स पाठवेल. जे लोक हि मान्य करतील त्यांना मुभा दिली जाईल. कंपनी त्यांना हळूहळू नोटिफिकेशन पाठवणे बंद करेल आणि एका वेळेनंतर अश्या युजर्सच्या अकाउंटवर कंपनीद्वारे WhatsApp च्या सेवा मर्यादित केल्या जातील.

हे देखील वाचा : Redmi K40 Gaming Enhanced Edition ला भारतात मिळाले BIS सर्टिफिकेशन, Poco ब्रँडिंगसह लवकरच होऊ शकतो लॉन्च

पाठवता येणार नाहीत मेसेज

WhatsApp Privacy Policy चा स्वीकार न करणाऱ्या युजर्सच्या अकांउटवर कंपनीद्वारे निर्बंध लादले जातील. याअंतर्गत युजर्स आपल्या अ‍ॅपमध्ये चॅट लिस्ट वापरू शकणार नाहीत. याचा अर्थ असा कि चॅट लिस्ट उपलब्ध न झाल्यामुळे व्हाट्सअ‍ॅप युजर्स कोणालाही मेसेज पण पाठवू शकणार नाहीत. तसेच चॅट लिस्ट न मिळाल्यामुळे कोणताही कॉन्टेक्ट दिसणार नाही तसेच कोणालाही वॉयस कॉल किंवा व्हिडीओ कॉल करता येणार नाही. म्हणजे व्हाट्सअ‍ॅप आपल्या सेवांसाठी पैसे आकारणार नाही पण अटी न मानणाऱ्या युजरवर निर्बंध लादले जातील.

Whatsapp logo on qube

मेसेज रिसीव करण्याचा मिळेल ऑप्शन

व्हाट्सअ‍ॅप प्राइवेसी पॉलिसी न स्वीकारणाऱ्या युजर्सना चॅट लिस्ट अ‍ॅक्सेस तर मिळणार नाही पण अश्या युजर्सना कोणी मेसेज पाठवला तर त्यांच्या व्हाट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये तो मेसेज दिसेल. नोटिफिकेशनच्या माध्यमातून तो मेसेज वाचता येईल आणि त्याला रिप्लाई पण देता येईल. त्याचप्रमाणे वॉयस/वीडिया कॉल पण रिसीव करता येईल.

हे देखील वाचा : PUBG फॅन्ससाठी खुशखबर: Battlegrounds Mobile India डाउनलोडसाठी उपलब्ध, परंतु…

कालांतराने बंद होतील सर्व सेवा

मेसेज व कॉल रिसीव करण्याची सूट दिल्यानंतर काही दिवसांनी WhatsApp द्वारे मर्यादित सेवा पण पूर्णपणे बंद केली जाईल. व्हाट्सअ‍ॅप युजर फक्त कॉलच रिसीव करू शकणार नाहीत तर आलेले मेसेज वाचून त्याला उत्तर पण देऊ शकणार नाहीत. म्हणजे काही वेळाने व्हाट्सअ‍ॅप पूर्णपणे बंद होईल.

यावरून स्पष्ट झाले आहे कि जर WhatsApp वापरायचे असेल तर अ‍ॅपची नवीन Privacy Policy 2021 स्वीकारावी लागेल आणि सर्व टर्म अँड कंडिशन मान्य कराव्या लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here