OTT वरील सर्वात भीतीदायक चित्रपट; हॉलीवुडच्या हॉरर चित्रपटांनाही टाकतील मागे

ओटीटीवर सतत अनेक चित्रपट व सीरीज रिलीज होत आहेत. परंतु काही प्रेक्षकांना हॉरर मुव्हीज आणि स्टोरीज (Horror Movies) खूप आवडतात. जर तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक असाल तर आम्ही तुमच्यासाठी आज बॉलिवुडच्या अश्या भयपटांची (horror movies on ott 2022) ची माहिती घेऊन आलो आहोत जे तुम्ही घर बसल्या आरामात ओटीटीवर बघू शकता. आम्ही तुमच्यासाठी काही असे बॉलीवुडचे चित्रपट घेऊन आलो आहोत जे पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. या यादीतील चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला एकटं झोपण्यास देखील भीती वाटू शकते. चला जाणून घेऊया ओटीटीवर उपलब्ध असलेल्या अशा काही हॉरर चित्रपटांबाबत…

Horror Movies On OTT

  • Tumbbad
  • Horror Story
  • Bhoot Part One: The Haunted Ship
  • 13B: Fear Has a New Address
  • 1920

Tumbbad

जर तुम्ही भयपटांचे चाहते असाल तर हा चित्रपट मिस करण्याची मोठी चूक करू नका, हा चित्रपट पहिला नसेल तर आजच हा बघून टाका. ‘तुंबाड’ घाबरावणारी दृश्य आणि इंटेंस हॉरर थ्रिलर सेट-अप असलेला एक शानदार हॉरर चित्रपट आहे. पौराणिक आणि भीतीदायक गोष्ट यांची सांगड घालून बनवण्यात आलेली ही फिल्म दर्शकांच्या अंगावर काटा आणते. चित्रपटाच्या विषय, अभिनय आणि बॅकग्राउंड स्कोरनं लोकांची मने जिंकली आहेत. इतकेच नव्हे तर 2018 मध्ये रिलीज झालेल्या या फिल्मला IMDB वर 8.2 रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर बघता येईल. इतकेच नव्हे तर हा चित्रपट बनवण्यासाठी एकूण 6 वर्षांचा कालावधी लागला होता.

Horror Story

हा चित्रपट तुम्ही युट्युबवर बघू शकता. ‘हॉरर स्टोरी’ साल 2013 मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटात सात मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे जे एका पछाडलेल्या होटलमध्ये रात्र घालवण्याच्या साहस करताना अडकून पडतात. चित्रपटात रविश देसाई, हसन जैदी, करण कुंद्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Bhoot Part One: The Haunted Ship

हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे. ही फिल्म सुरुवातीला बॉलीवुडच्या अन्य हॉरर फिल्म्सपेक्षा थोडी वेगळी आहे. यातील अनेक दृश्य पाहून तुमचा भीतीने थरकाप उडेल. या फिल्ममध्ये पृथ्वी (विक्की कौशल) एक शिपयार्ड कंपनीमध्ये अधिकारी आहे. त्याची पत्नी (भूमि पेडणेकर) आणि मुलगी एका दुर्घटनेत मरण पावले होते. चित्रपट विक्की कौशलच्या आयुष्याच्या अवतीभवती फिरतो.

13B: Fear Has a New Address

दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवुडमध्ये देखील नाव कमवणारा अ‍ॅक्टर आर माधवन आणि नीतू चंद्रन यांचा 13B: Fear Has a New Address देखील एक भयपट आहे. हा चित्रपट साल 2009 मध्ये रिलीज झाला होता. ही फिल्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर बघता येईल. चित्रपटाची गोष्ट पाहता, जेव्हा माधवन यांचं कुटुंब नवीन फ्लॅट 13बी मध्ये शिफ्ट होतं तेव्हा त्यांच्यासोबत वेगवेगळ्या घटना घडू लागतात ज्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक भयानक वळणं येतात.

1920

ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे. बॉलीवुडच्या शानदार हॉरर चित्रपटांपैकी एक फिल्म ‘1920’ साल 2008 मध्ये रिलीज करण्यात आली होती. या चित्रपटात रजनीश दुग्गल आणि अदा शर्मा सारखे स्टार आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here