Electric Car सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी येतेय Xiaomi; स्वस्तात मिळणार ‘ऑटोमॅटिक’ चालणारी कार

गेल्यावर्षीपासून Xiaomi Electric Car ची चर्चा सुरु झाली होती. आता बातमी आली आहे की कंपनी ऑगस्टमध्ये ही कार जगासमोर ठेवणार आहे. कंपनी ऑगस्टमध्ये एक पब्लिक इव्हेंट करणार आहे, ज्यात कार प्रदर्शित केली जाऊ शकते. ही बातमी सर्वप्रथम शीना टेकनं प्रकाशित केली आहे आणि त्यांनी दावा केला आहे की, Xiaomi चे फाउंडर Lei Jun पुढील महिन्यात प्रोटोटाइप Xiaomi Electric Car सादर करणार आहेत. रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की ते जास्त वेळ शाओमी हेडक्वार्टरमध्ये व्यतीत करत आहेत आणि कंपनीचा कार प्रोजेक्ट योग्यरीत्या पार पडावा याची काळजी घेत आहेत.

लवकरच सुरु होईल Xiaomi Electric Car ची टेस्ट ड्राईव्ह

या प्रोटोटाइप कारचं प्रदर्शन झाल्यानंतर ही कार लाँच होण्यास थोडा वेळ जाऊ शकतो. कारण सध्या हिची वेगवेगळ्या कंडीशनमध्ये टेस्ट ड्राईव्ह करणं बाकी आहे. बातमीनुसार, कारची टेस्ट ड्राईव्ह यावर्षी हिवाळ्यात सुरु होईल. Xiaomi Electric Car ची डिजाइन HVST ऑटोमोबाईलद्वारे तयार करण्यात आली आहे. या टीमनं WM Motor साठी Maven concept car कार डिजाइन केली होती. कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटला ऑटोमॅटिक ब्रँडच्या स्वरूपात स्थापन करू इच्छित आहे. यासाठी पीआर डायरेक्टरची नियुक्ति करण्यात आली आहे आणि मार्केटिंग कॅम्पेन ऑगस्टमध्ये कार सादर केल्यानंतर सुरु होईल.

Xiaomi Electric Car ची तयारी

इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये कंपनी संपूर्ण तयारी करून येत आहे. कंपनीनं गेल्यावर्षीच घोषणा केली होती आणि यासाठी 7 अरब रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची घोषणा ऑटोमेटिक ब्रँडसाठी करण्यात आली होती. Xiaomi नं आपला ऑटो मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चीनच्या Yizhuang शहरात उभारला आहे. तसेच कंपनीची रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम देखील आहे. आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार हा प्लांट पूर्ण क्षमतेसह कार्यरत झाल्यास दरवर्षी जवळपास 3,00,000 कार्सची निर्मिती केली जाऊ शकते.

शाओमी इलेक्ट्रिक कारच्या लुक बाबत बोलायचे तर या कारचे काही फोटो लीक झाले आहेत त्यानुसार ही कार MW Motors Maven च्या कॉन्सेप्ट कार सारखीच आहे. ही अगदी रिब्रँडेड मॉडेल वाटते. सध्या कंपनीची योजना दरवर्षी 1,50,000 कार बनवण्याची आहे.

Xiaomi Electric Car लाँच डेट

वर सांगितल्याप्रमाणे कंपनी आता आपली प्रोटोटाइप इलेक्ट्रिक कारचं प्रदर्शन करणार आहे परंतु कमर्शियल लाँच होण्यास अजूनही जवळपास दोन वर्षांचा कालावधी आहे. कंपनीनं यासाठी जवळपास 1,000 कर्मचाऱ्यांची फौज तयार केली आहे परंतु शाओमीची ही इलेक्ट्रिक कार बाजारात येण्यासाठी 2024 पर्यंतची वाट बघावी लागेल. सुरुवातीला कंपनी हिला चार मॉडेलमध्ये सादर करणार आहे ज्यात A+ आणि B असे सेग्मेंट असतील.

Xiaomi Electric Car ची किंमत

Xiaomi Electric Car च्या किंमतीची जी माहिती आतापर्यंत मिळाली आहे त्यानुसार A+ सेग्मेंटमधील मॉडेलची किंमत 1,50,000 आणि 2,00,000 चीनी युआन असेल जे 18 लाख आणि 25 लाख रुपयांच्या आसपास आहेत. तर B सेग्मेंटची कार 200,000 आणि 300,000 चीनी युआन अर्थात 25 लाख आणि 35 लाख रुपयांच्या आसपास सादर केली जाईल. या कार्समध्ये L3 Autonomous ड्राईव्हिंग टेक्नॉलॉजी सपोर्ट देण्यात येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here