ड्यूरेबल स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी DOOGEE नं आपला नवीन हँडसेट सादर केला आहे. कंपनीचा लेटेस्ट रगड स्मार्टफोन DOOGEE S89 Pro नावानं ग्राहकांच्या भेटीला आहे. हा स्मार्टफोन उंचावरून पडल्यावर देखील फुटणार नाही असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच पाण्यात पडल्यावर देखील हा हँडसेट वापरता येईल. DOOGEE S89 Pro स्मार्टफोन मीडियाटेक के दमदार प्रोसेसर आणि 12000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. DOOGEE S89 Pro स्मार्टफोन कंपनीनं जागतिक बाजारात खूप कमी किंमतीत लाँच केला आहे. ज्याची विक्री AliExpress च्या माध्यमातून केली जाईल.
DOOGEE S89 Pro ची किंमत आणि ऑफर
DOOGEE S89 Pro स्मार्टफोन फ्यूचरिस्टिक डिजाइन आणि अॅडव्हान्स फीचरसह सादर करण्यात आला आहे. हा फोन रगड स्मार्टफोन आहे जो बिकट परिस्थितीत वापरण्यासाठी डिजाईन करण्यात आला आहे. हा फोन 319 डॉलर (सुमारे 25,500 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. AliXepress वर हा स्मार्टफोन डिस्काउंटेड प्राईस 269 डॉलर (सुमारे 21,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर ग्राहकांना 30 डॉलरचा कुपन डिस्काउंट मिळत आहे. म्हणजे हा फोन फक्त 239 डॉलर (सुमारे 19,100 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा फोन 29 जुलै पर्यंत डिस्काउंटेड किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्यानंतर मूळ किंमतीत स्मार्टफोनची विक्री सुरु होईल. हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी असलेला खूप स्वस्त स्मार्टफोन लवकरच भारतात; कमी किंमतीत 50MP कॅमेरा
DOOGEE S89 Pro चे स्पेसिफिकेशन्स
DOOGEE S89 Pro स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा LCD FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Android 12 OS वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये MediaTek P90 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबतीला 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळते. युजर्स 512GB पर्यंत अतिरिक्त स्टोरेज टीएफ कार्डच्या मदतीनं वाढवू शकतात.
DOOGEE S89 Pro स्मार्टफोनमध्ये रोबोट शेप कॅमेरा बंप देण्यात आला आहे जो RGB लाईटिंगसह येतो. RGB लाईट युजर्स आपल्या आवडीनुसार कस्टमाइज करू शकतात. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP Sony प्रायमरी कॅमेरा, 20MP नाईट व्हिजन कॅमेरा आणि 8MP वाईड अँगल कॅमेरा मिळते. यात अनेक फोटोग्राफी मोड मिळतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: एक वर्षाची वैधता असलेला BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन; भरपूर डेटा आणि कॉलिंग
हा रगड स्मार्टफोन IP68/ 69K रेटिंग आणि मिलिटरी स्टँडर्ड MIL-STD-810H सर्टिफिकेशनसह येतो जे याला वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ आणि शॉक रेजिस्टंट बनवतात. हा फोन भिजल्यावर किंवा उंचावरून पडल्यावर देखील कोणत्याही अडचणीविना वापरता येतो. DOOGEE S89 Pro मध्ये 12000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.















