7 सप्टेंबरला Apple iPhone 4 सीरीज लाँच केली जाणार आहे. कंपनी एका मोठ्या इव्हेंटच्या माध्यमातून ही सीरिज सादर करेल. त्यामुळे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की यंदाचा आयफोन कसा असेल. यावेळी देखील दमदार स्पेसिफिकेशन मिळणार का? कॅमेऱ्याची क्वॉलिटी कशी असेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 2022 मध्ये येणाऱ्या आयफोनची किंमत किती असेल? तुमच्या या प्रश्नांची उत्तरे देण्याचं काम आम्ही या लेखात करणार आहोत. यावेळी कंपनी तुम्हाला सरप्राइज करणार हे मात्र निश्चित आहे.
कंटेंट टेबल
- iPhone 14 लाँच डेट
- iPhone 14 सीरीजचे सर्व मॉडेल
- iPhone 14 ची भारतीय किंमत
- iPhone 14 ची डिजाइन
- iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 14 लाँच डेट
गेली अनेक वर्ष Apple, iPhone सीरीज सप्टेंबरमध्ये लाँच करत आहे आणि यावेळी देखील असंच होणार आहे. कंपनीनं अधिकृतपणे तारीख घोषित केली आहे आणि हा फोन 7 सप्टेंबरला जागतिक स्थरावर रीलीज होत आहे. तर iPhone 14 सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसरा आठवड्यात उपलब्ध होऊ शकतो. विशेष ग्लोबल लाँचमध्ये भारताचा देखील समावेश आहे. हे देखील वाचा: दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती
एका टिपस्टरनं या फोनच्या सेल डेटची देखील माहिती दिली होती, त्यानुसार iPhone 14 चे सर्व मॉडेल 23 सप्टेंबरपासून सेलसाठी उपलब्ध होतील. परंतु या लीकनंतर काही दिवसांनी दुसरी माहिती आली, त्यात सांगण्यात आलं होतं की नवीन आयफोन सीरीज 13 सप्टेंबरला लाँच होईल परंतु सेल डेट पुढे ढकलली जाऊ शकते. Nikkei Asia च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की चीनमध्ये लॉक डाउन असल्यामुळे आयफोनच्या निर्मितीला विलंब होत आहे त्यामुळे या फोन्सची विक्री उशिरा सुरु होईल. असं देखील सांगण्यात आलं होतं की इतर मॉडेलची विक्री सुरु होईल परंतु iPhone 14 Pro Max उशिरा बाजारात येईल. परंतु अलीकडेच बातमी आली आहे की कंपनी आता चीनमध्ये नव्हे तर भारतात आयफोन 14 ची निर्मिती करेल, त्यामुळे नवीन फोनची विक्री उशिरा सुरु होईल.
iPhone 14 सीरीजचे सर्व मॉडेल
मागच्या वेळी कंपनीनं iPhone 13 सीरीजमध्ये चार मॉडेल सादर केले होते ज्यात iPhone 13 सह iPhone 13 मिनी, iPhone 13 प्रो आणि iPhone 13 प्रो मॅक्सचा समावेश होता. यातील iPhone 13 मिनीची विक्री चांगली झाली नाही. त्यामुळे कंपनीनं यंदा हा मॉडेल हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे iPhone 14 सह iPhone 14 Plus किंवा Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max बाजारात येऊ शकतात.
iPhone 14 ची भारतीय किंमत (price in India)
आयफोन महाग असल्याची तक्रार अनेकदा केली जाते परंतु यंदा येणार iPhone 14 त्याहीपेक्षा महाग असल्याची बातमी रिपोर्ट्समधून समोर आली आहे. याची दोन कारणे आहेत, पहिला म्हणजे यावेळी कंपनी मिनी व्हर्जन सादर करत नाही. त्यामुळे बेस मॉडेलची प्राइस जास्त होईल. तसेच डॉलरची किंमत वाढल्यामुळे किंमतीत जास्त फरक दिसेल. लिक्सनुसार यंदा किंमतीत 10,000 रुपयांपर्यंतची वाढ दिसू शकते. iPhone 13 ची प्रारंभिक किंमत 79,900 रुपये होती. तर यावेळी iPhone 14 ची भारतातील किंमत 89,900 रुपये असू शकते, तर iPhone 14 Max ला कंपनी Rs 99,900 रुपयांमध्ये सादर करू शकते. iPhone 14 Pro ची किंमत 1,29,900 आणि iPhone 14 Pro Max 1,39,900 रुपयांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
iPhone 14 ची डिजाइन
iPhone 14 च्या डिजाइनमध्ये यंदा कंपनी मोठा बदल करेल. बेस मॉडेलमध्ये देखील हा डिजाइन चेंज दिसेल. आयफोन 14 कंपनी बॉक्स डिजाइनमध्ये सादर करू शकते ज्यात एज अगदी सपाट दिसतील. तर मोठ्या मॉडेलमध्ये एक दोन बदल दिसतील, खासकरून डिस्प्ले बाबत यावेळी काही नवीन गोष्टी दिसतील.
iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: iPhone 14 च्या सर्व मॉडेलमध्ये तुम्हाला यावेळी OLED डिस्प्ले मिळू शकतो, जसा आयफोन 12 आणि आयफोन 13 मध्ये मिळाला होता. यावेळी कंपनी iPhone 14 आणि iPhone Plus किंवा Max मॉडेलमध्ये देखील ProMotion डिस्प्लेचा वापर करू शकते. तसेच बेस मॉडेलमध्ये देखील हाय रिफ्रेश रेट मिळू शकतो.
iPhone 14 आणि iPhone 14 Plus किंवा Max मॅक्स मॉडेलमध्ये 6.1-इंचाचा LTPS OLED डिस्प्ले 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. तसेच वेरियेबल रिफ्रेश रेट आणि ऑलवेज ऑन डिस्प्ले सारखे फीचर्स मात्र दिसणार नाही. तर मोठ्या मॉडेल iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये कंपनी 6.7-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह सादर करू शकतेै.
कॅमेरा: आयफोनमधील कॅमेऱ्याचे मेगापिक्सल कमी असले तरी क्वॉलिटी जबरदस्त असते आणि कंपनी एक बेंचमार्क सेट करते. नवीन सीरीजमध्ये कॅमेरा पाहता बेस मॉडेलमध्ये 12MP चा ड्युअल कॅमेरा मिळू शकतो. सोबत 12MP चा फ्रंट कॅमेरा असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार मेन कॅमेरामध्ये तुम्हाला जुन्या मॉडेलच्या तुलनेत जास्त बदल दिसणार नाही. तर टिपस्टर Ming-Chi Kuo नुसार सेल्फी कॅमेऱ्याचा अपर्चर अपग्रेड होईल. कंपनी f/1.9 अपर्चरचा वापर करू शकते जो ऑटो फोकस फीचरसह येईल. जुन्या मॉडेलमध्ये f/2.2 चा फिक्स्ड फोकस अपर्चर देण्यात आला होता.
मोठ्या मॉडेलमध्ये कॅमेरा खूप अपग्रेड करण्यात येईल. यावेळी कॅप्सूल शेप पंच होल स्क्रीनच्या वर देण्यात येईल. यावेळी कॅमेऱ्यासह Face ID dot projector दिला जाऊ शकतो. Ross Young नुसार कंपनी डिस्प्लेमध्ये Face ID साठी हार्डवेयर देऊ शकते, त्यामुळे नवीन डिजाइननुसार डिस्प्लेचा आकार कमी राहील. तर iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये 48MP हाय रिजोल्यूशन कॅमेरा दिला जाऊ शकतो.
कनेक्टिव्हिटी: यावेळी अॅप्पल फोनमध्ये USB-C पोर्ट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु नवीन लिक्सनुसार आयफोन 14 सीरीजमध्ये कंपनी लायटनिंग पोर्टचाच वापर करेल. आयफोन iPhone 15 पासून यूएसबी-सी पोर्टचा वापर केला जाऊ शकतो, कारण युरोपीय यूनियनने अनिवार्य केलं आहे.
Apple 14 सीरीजमधील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी (satellite connectivity) फीचरची चर्चा मात्र जोरदार आहे. हे फीचर आपत्कालीन परिस्थितीमध्ये सिमविना छोटे मेसेजेज पाठवण्यास मदत करेल. तसेच कंपनी यावेळी सिम स्लॉट काढून टाकू शकते. तुम्हाला फक्त e-SIM चा ऑप्शन मिळेल. तसेच नवीन आयफोनमध्ये Wi-Fi 6E मिळणार आहे, ही सर्व माहिती अॅप्पल अॅनालिस्ट Ming-Chi Kuo यांनी दिली आहे.
प्रोसेसर: प्रोसेसरच्या बाबतीत अॅप्पल युजर्सना थोडी निराशा होऊ शकते. खासकरून बेस मॉडेल घेणाऱ्या युजर्सना. iPhone 14 आणि Plus किंवा Max मध्ये जुना A15 Bionic प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तर A16 Bionic प्रोसेसर फक्त iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये मिळेल. Ming-Chi Kuo च्या मते कंपनीनं जुन्या प्रोसेसरच्या तुलनेत यावेळी जास्त बदल केलेला नाही, त्यामुळे परफॉर्मन्समध्ये जास्त फरक दिसणार नाही.
यावेळी तुम्हाला vapour chamber cooling system मिळू शकते. कंपनी यावर खूप काम करत आहे. Ming-Chi Kuo नुसार, व्हेपर चेंबर कूलिंग अँड्रॉइड फोन प्रमाणेच काम करेल. यावेळी कूलिंग सिस्टम आणण्यामागे मोठे कारण 5जी कनेक्टिव्हिटी आहे. यामुळे इंटरनेट जरी खूप फास्ट झालं तर तरी आयफोनमध्ये हीटिंग सारखी समस्या येत आहे. परंतु बेस व्हेरिएंटच्या ऐवजी ही टेक्नॉलॉजी फक्त iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये देण्यात येईल.
सॉफ्टवेयर: iPhone 14 च्या सर्व मॉडेलमध्ये तुम्हाला iOS 16 ओएस आउट ऑफ द बॉक्स मिळेल. नवीन ओएसमध्ये सर्वात मोठा बदल यावेळी लॉक स्क्रीन कस्टमायजेशन फीचरचा आहे. आता तुम्ही फोनच्या लॉक स्क्रीनवर फोटो, फॉन्ट स्टाइल आणि कॅलेंडर, वेदर, डेट, टाइम झोन, अलार्म आणि बॅटरी लेव्हलसह अनेक विजेट्स सेट करू शकता. तुम्ही एकाच फोनमध्ये अनेक लॉक स्क्रीन ठेऊ शकता. काही दिवसांपूर्वी कंपनीनं iOS 16 बीटा रिलीज केला होता ज्यात फोनचे फीचर्स तुम्ही पाहू शकता. हे देखील वाचा: iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार
तसेच iOS 16 मध्ये तुम्हाला शेयर्ड फोटो लायब्ररी फीचर, फास्ट टायपिंग डिटेक्शन कीबोर्ड, हेल्थ फीचर, ईमेल शेड्यूलिंग, मल्टी स्टॉप मॅप, व्हिडीओमध्ये टेक्सट सपोर्ट आणि सफारीमध्ये ग्रुप टॅबला सपोर्ट सारखे फीचर्स मिळतील.
iPhone 14 ला संमिश्र प्रतिसाद मिळू शकतो. चांगल्या फीचर्सचं कौतुक केलं जाईल तर जुने फीचर्स नव्याने सादर केल्यास कंपनी ट्रोल देखील होऊ शकते, परंतु iPhone 14 ची वाट मात्र सर्वच पाहत आहेत.