पृथ्वीनं वाढवला आपला वेग; 24 तासांच्या आधीच संपला दिवस, शास्त्रज्ञांची झोप उडाली

अंतराळात कधी कधी काही अशा घटना घडतात ज्यांच्यामुळे आपलं ज्ञान किती कमी आहे याची जाणीव आपल्याला होते. जगभरातील शास्त्रज्ञ अशा घटनांवर लक्ष ठेऊन असतात. परंतु काही घटना त्यांना देखील भुवया उंचावयाला भाग पाडतात. अशीच एक घटना 29 जुलैला घडली आहे. आपल्या पृथ्वीने आपलं परिवलन 24 तासांच्या आधीच पूर्ण केलं आहे. पृथ्वीने स्वतःभोवती एक चक्कर पूर्ण करण्यासाठी 24 तासांपेक्षा 1.59 milliseconds इतका कमी वेळ घेतला आहे आणि त्यामुळे 29 जुलै 2022 ची सर्वात छोटा दिवस म्हणून इतिहासात नोंद झाली आहे.

एका दिवसात 24 तास असतात या कालावधीत पृथ्वी आपल्या अक्षाभोवती एक चक्कर पूर्ण करते. याला परिवलन असं म्हणतात. परिवलनाच्या वेळेवरून आपला दिवस 24 तासांचा ठरला आहे. परंतु अलिकड़े एक विचित्र खगोलीय घटना घडली आहे जिने संपूर्ण जागाच लक्ष वेधून घेतलं आहे. पृथ्वीने एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ घेतला आहे. शास्त्रज्ञांनी याला Earth’s fastest rotation म्हटलं आहे आणि याची नोंद करण्यात आली आहे. हे देखील वाचा: Nasa नं दिली अजून धोकादायक सौर स्फोटाची चेतावणी; पृथ्‍वीवर होऊ शकतो मोठा परिणाम

पृथ्वीवरील सर्वात छोटा दिवस (Earth’s Shortest Day)

29 जुलै हा दिवस मानव इतिहासातील सर्वात चित्तवेधक, रहस्यम आणि अविस्मरणीय दिवसांपैकी एक ठरला आहे. याला Earth’s Shortest Day म्हणजे पृथ्वीवरील सर्वात छोटा दिवस म्हणण्यात आलं आहे. वर्षानुवर्षे पृथ्वीचा स्वतःभोवती वेग कमी होत आला आहे. त्यामुळे दरवर्षी 31 डिसेंबरला घड्याळात एक लीप सेकंड जोडला जातो. परंतु गेले काही वर्ष पृथ्वीनं आपला वेग वाढवला आहे. जुलैच्या 29 तारखेला तर पृथ्वीने 1.59 मिलीसेकंड आधीच स्वतःभोवतीचं भ्रमण पूर्ण करून नवीन विक्रम केला आहे.

मानवासाठी धोका?

जगभरातील शास्त्रज्ञ पृथ्वीच्या वाढलेल्या वेगाचे कारण शोधत आहेत. 29 जुलैला पृथ्वी आपल्या सरासरी वेगापेक्षा जास्त वेगाने फिरली आणि असाच वेग वाढत गेल्यास त्याचा मानवी जीवनावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. जेव्हापासून ऑटोमिक क्लॉक्सचा वापर करून वेळ मोजली जाऊ लागली आहे तेव्हापासून 28 वेळ सरासरीपेक्षा छोट्या दिवसांची नोंद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 जुलै 2020 ला देखील पृथ्वीने 24 तासांपेक्षा 1.47 मिलीसेकंड आधी आपलं परिवलन पूर्ण केलं होतं. हे देखील वाचा: 5G नंतर बंद होणार का 4G सर्व्हिस? 3G आणि 2G चं काय होणार?

टेक्नॉलॉजीसाठी मोठं आव्हान

अनेक शास्त्रज्ञांनी याला ‘Chandler wobble’ दोष असं म्हटलं आहे. ही घटना आपल्या वेळ मोजण्याच्या परिमाणांवर परिणाम करू शकते. वारंवार असं घडल्यास वर्षाअखेर निगेटिव्ह लीप सेकंड जोडण्याची वेळ येऊ शकते. शास्त्रज्ञ त्याचा देखील विचार करत आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here