स्वस्त, सुंदर, टिकावू! 6.6-इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच झाला बजेट फ्रेंडली फोन, किंमत फक्त 6,799

Infinix खूप दिवसांपासून इंडिया मोबाइल मार्केटमध्ये आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी कमी किंमतीत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. Transsion Holdings च्या मालकीची स्मार्टफोन कंपनी इनफिनिक्सनं आज आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत बजेट कॅटेगरीमध्ये नवीन Smartphone लाँच केला आहे. हा Mobile Phone कंपनीनं Infinix Smart 6 HD नावानं सादर केला आहे. पुढे आम्ही या बजेट स्मार्टफोन च्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची संपूर्ण माहिती देत आहोत.

Infinix Smart 6 HD Price आणि Sale

Infinix Smart 6 HD भारतात सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे. फोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे, ज्याची किंमत 6,799 रुपये आहे आणि हा फोन अ‍ॅक्वा स्काय, फोर्स ब्लॅक आणि ओरिजिन ब्लू तीन रंगात विकत घेता येईल. तसेच डिवाइसची विक्री ई-कॉर्मस वेबसाईट फ्लिपकार्टवर August 12 पासून सुरु होईल. हे देखील वाचा: 64MP चा दमदार कॅमेऱ्यासह TECNO CAMON 19 Pro 5G फोन येतोय भारतात, पाहा कधी होणार लाँच

Infinix Smart 6 HD चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 6.6 इंचाच्या टीएफटी एलसीडी 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनच्या फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर डिस्प्ले 1600 x 720 पिक्सलचा एचडी+ रिजोल्यूशन आणि 500 निट्स पीक ब्राईटनेससह येतो. फोनला पावर देण्यासाठी यात क्वॉड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 एसओसी आहे. चिपसेटला PowerVR GE8320 GPU आणि 2GB RAM ची जोड देण्यात आली आहे. याची इंटरनल स्टोरेज 32GB आहे, जी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येते. तसेच स्मार्ट 6 एचडी Android 11 गो व्हर्जन वर चालतो. हे देखील वाचा: फक्त 18,249 रुपयांमध्ये मिळतोय OnePlus चा दमदार स्मार्टफोन; स्वस्तात 6GB RAM, 5000mAh ची बॅटरी

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आहे. यात सिंगल कॅमेरा सेन्सर आणि मॉड्यूलमध्ये एक एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. ट्रिपल-कॅमेरा सेटअप प्रमाणे डिसरन्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये दोन डमी कटआउट देखील आहेत. स्मार्ट 6 एचडी मध्ये 8MP चा रियर कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी वॉटर-ड्रॉप नॉचमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. स्मार्ट 6 एचडी मध्ये मायक्रो-यूएसबी पोर्टला सपोर्ट करतो. यात 5W चार्जिंग सपोर्ट असलेली 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा 3.5 मिमी हेडफोन जॅक, सिंगल स्पिकर आणि ड्युअल-सिमला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here