7 दिवसांचा बॅटरी बॅकअप, किंमत 1200 रुपयांपासून सुरु; हे आहेत बेस्ट 2G Phone

5जी सर्व्हिस भारतात सुरु होणार आहे आणि यावर्षीच्या अखेरपर्यंत किंवा 2023 च्या सुरुवातीला संपूर्ण भारतात 5G Network सक्रिय होऊ शकतं. 5जी टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटच्या बाबतीत खूप अ‍ॅडव्हान्स असेल तर दुसरीकडे अजूनही भारतात मोठ्या प्रमाणात लोक 2G Mobile Phone वापरण्याला पसंती देतात. हे कीपॅड असलेले हे बेसिक फोन वापरणं सोपं आहे. अशाच फीचर फोन युजर्ससाठी आज आम्ही मार्केटमधील Best 5 2G Phones ची यादी घेऊन आलो आहोत जे मजबूत बॉडीसह जास्त बॅटरी बॅकअप देतात.

1. Nokia 105 Plus

नोकिया 105 प्लस 2जी फीचर फोन 1.77 इंचाच्या क्यूक्यूवीजीए डिस्प्लेसह लाँच झाला आहे. हा फोन टी9 कीबोर्ड वर बनला आहे ज्यात स्क्रीनच्या खाली कीपॅड आहे तसेच वरच्या बाजूला स्पिकर आहे. Nokia 105 Plus मोबाइल फोन 1,399 रुपयांमध्ये Charcoal आणि Red मध्ये विकत घेता येईल. हा मोबाइल एस30+ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

Nokia 105 Plus मध्ये टॉर्च लाइट व क्लॉसिक नोकिया गेम सोबतच 3.5एमएम जॅक, मायक्रो यूएसबी, वायरलेस एफएम रेडियो, एमपी3 प्लेयर आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. नोकिया 105 प्लस फीचर फोन 4एमबी रॅम आणि 4एमबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्यात 32जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करता येतो. तसेच पावर बॅकअपसाठी 1,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

2. SAMSUNG Guru Music 2

सॅमसंगचा हा कीपॅड असलेला मोबाइल फोन फक्त 1,970 रुपयांमध्ये विकत घेता येईल जो शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन आणि रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध आहे. या फोनचे फीचर्स पाहता हा सॅमसंग मोबाइल 128 x 160 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 2.0 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 65के कलर आउटपुटदेतो. हा फोन Blue, Gold, Black आणि White कलरमध्ये विकत घेता येईल.

SAMSUNG Guru 1200 मध्ये पावर बॅकअपसाठी 800एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी अनेक दिवसांचा बॅकअप देऊ शकते. हा ड्युअल सिम फोन 2जीवर चालतो. त्याचबरोबर सॅमसंगनं आपला हा मोबाइल फोन एमपी3, वर्ल्ड क्लॉक, स्टॉप वॉच, टॉर्च लाईट सारख्या फीचर्सनं सुसज्ज केला केला आहे.

3. DIZO Star 300

हा कीपॅड असलेला मोबाइल फोन गेल्यावर्षीच भारतीय बाजारात आला होता, जो 1,299 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला तेच. या फोनमध्ये 160 x 120 पिक्सल रिजोल्यूशन असलेली 1.77 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फीचर फोन 32एमबी रॅमसह 32एमबी स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच फोन मेमरी कार्डच्या माध्यमातून 64जीबी पर्यंत वाढवता येते.

DIZO Star 300 मध्ये फोटोग्राफीसाठी 0.3एमपी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशसह येतो. हा मोबाइल फोन SC6531E प्रोसेसरवर चालतो तसेच पावर बॅकअपसाठी यात 2,550एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या कीपॅड असलेल्या फोनमध्ये दोन सिम कार्ड स्लॉट आणि ब्लूटूथ देखील देण्यात आलं आहे. यात 8 प्रादेशिक भाषांचा सपोर्ट मिळतो. मार्केटमध्ये हा मोबाइल Black, Blue आणि Green कलरमध्ये विकत घेता येईल.

4. Moto A70

Motorola चा हा keypad mobile गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात आला होता. सध्या मोटो ए70 मोबाइल फोन शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर 1,849 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे, तासेक्स याच प्राइस रेंजमध्ये हा मोबाइल दुकानातून देखील विकत घेता येईल. फीचर्स पाहता यात 240 x 320 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 2.4 इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 167पीपीआयला सपोर्ट करतो. या फोनचं वजन फक्त 89.5 ग्राम आहे.

Moto A70 मध्ये 4 एमबी रॅम आणि 4 एमबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनमध्ये 2000 फोन नंबर सेव्ह करता येतात. हा फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. मनोरंजनासाठी एमपी3 प्लेयर आणि एफएम आहे ज्यांचा आनंद 3.5एमएम जॅकचा वापर करून घेता येतो. कीपॅड असलेला मोटो ए70 मोबाइल फोटोग्राफीसाठी 0.3 मेगापिक्सल कॅमेरा लेन्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी यात 1,750एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

5. Lava A1

कीपॅड असलेल्या मोबाइल फोन्समध्ये लावाचं नाव देखील सर्वात वर येतं. या कंपनीचा लावा ए1 मोबाइल फक्त 1,199 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे जो White Grey आणि Light Blue कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 128 x 160 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 1.8 इंचाचा क्यूक्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे.

हा लावा मोबाइल 800एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो तसेच फोटोग्राफीसाठी या मोबाइलच्या बॅक पॅनलवर वीजीए कॅमेरा देखील देण्यात आला आहे. मोठ्या बॅकअपसाठी यात सुपर बॅटरी मोड मिळतो. या कीपॅड फोनमध्ये वायरलेस एफएम आणि आटो कॉल रेकॉर्डिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हा लावा फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here