Jio नं स्वातंत्र्य दिनानिमित्त काही दिवसांपूर्वी एक ऑफर सादर केली होती. या ऑफरमध्ये ग्राहकांना 3000 रुपयांचे मोफत फायदे मिळत आहेत. ‘2999 Independence Offer 2022′ रिचार्ज प्लॅनसह 100 टक्के व्हॅल्यू बॅक दिली जात आहे. तर , आता कंपनीनं Jio च्या प्रीपेड युजर्ससाठी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 750 रुपयांचा नवीन प्लॅन सादर केला आहे. ज्यात भरपूर डेली डेटा, फ्री कॉलिंग आणि एसएमएससह दीर्घ वैधता दिली जात आहे. चला जाणून घेऊया Jio च्या या नव्याकोऱ्या रिचार्ज प्लॅनबाबत.
Jio Rs 750 Recharge Plan झाला लाँच
जियोनं हा नवीन रिचार्ज प्लॅन भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सादर केला आहे. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस सोबतच दीर्घ वैधता देखील दिली जात आहे. जर तुम्ही हा प्लॅन तुमच्या Jio Number वर रिचार्ज करू इच्छित असाल तर या लिंकवर क्लिक करू शकता. चला जाणून घेऊया तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची सविस्तर माहिती.

180GB डेटा सह फ्री कॉलिंग
या प्लॅन अंतगर्त कंपनी 90 दिवसांची वैधता देत आहे. जर तुम्ही एक दीर्घ वैधता असलेला प्लॅन शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. 90 दिवसांच्या वैधतेदरम्यान रिचार्ज प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा ऑफर केला जात आहे. म्हणजे संपूर्ण कालावधीत युजर्सना एकूण 180जीबी डेटा वापरता येईल. डेटा लिमिट संपल्यावर जियो युजर्सना 64Kbps च्या स्पीडवर अनलिमिटेड डेटा मिळेल.
तसेच ग्राहकांना या Plan मध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग फ्री दिली जात आहे. डेली डेटा आणि फ्री कॉलिंग सोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 100 FREE SMS देखील मिळत आहेत. इतकेच नव्हे तर प्लॅनसह Jio अॅप्सचं कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळेल. त्यामुळे युजर्स कधीही आणि कुठेही अॅप्सचा वापर करता येईल.
HAR GHAR TIRANGA, HAR GHAR JIOFIBER ऑफर
JioFiber Independence-Day offer अंतगर्त जियोनं जियोफायबरच्या नवीन युजर्ससाठी देखील एक धमाकेदार Offer सादर केली आहे. कंपनीनं माहिती दिली आहे की, जर कोणी नवीन JioFiber कनेक्शन घेतलं तर त्यांना प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स अतिरिक्त 15 दिवसांसाठी मोफत मिळतील. या ऑफरचा लाभ 12 ऑगस्टपासून 16 ऑगस्टपर्यंत घेता येईल.
ही ऑफर नवीन JioFiber ग्राहकांना Post-Paid entertainment bonanza plans (Rs 499, Rs 599, Rs 799, Rs 899 plans) वर उपलब्ध असेल. तसेच 6/12 महिन्यांच्या प्लॅनवर या ऑफरचा लाभ घेता येईल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कंपनीच्या MyJio (MyVouchers section) मध्ये जावे लागेल, जिथे डिस्काउंट कॅश व्हाउचर मिळतील.
















