Bollywood मध्ये आपल्या कामाच्या जीवावर वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता संजय मिश्रा यांना न ओळखणारे सिनेप्रेमी खूप कमी असतील. Sanjay Mishra असे अभिनेता आहेत जे कॉमेडीसह गंभीर भूमिकांतून दर्शकांसह समीक्षकांची देखील मने जिंकतात. जर तुम्ही देखील संजय मिश्रा यांचे चाहते असाल आणि ओटीटीवर त्यांचे चित्रपट बघण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात. आम्ही आज संजय मिश्रा यांच्या 5 बेस्ट चित्रपटांची माहिती देत आहोत जे तुम्ही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करू शकता.
Sanjay Mishra Best Movies On OTT
- Kaamyaab
- Ankhon Dekhi
- Kadvi Hawa
- Ekkees Tareekh Shubh Muhurat
- Total Dhamaal
1. Kaamyaab
टीव्हीवरील लोकप्रिय शो Office Office मधून आपल्या अभिनयाची ताकद दाखवणाऱ्या संजय मिश्रांनी अलीकडेच ‘कामयाब’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. ‘कामयाब’ चित्रपटातून एका वयस्कर व्यक्तीची गोष्ट सांगण्यात आली आहे ज्याने सहाय्यक अभिनेता म्हणून 499 चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि पुन्हा सिनेसृष्टीत जाऊन 500 चित्रपट पूर्ण करायचे आहेत. हा चित्रपट Youtube, Netflix, Apple TV आणि Google Play Movies and Tv वर बघता येईल. हे देखील वाचा: Kantara सारखे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ‘हे’ आहेत 5 दाक्षिणात्य चित्रपट; OTT प्लॅटफॉर्म्सवर करता येतील स्ट्रीम
2. Ankhon Dekhi
‘आंखों देखी’ चित्रपटासाठी संजय मिश्रांना फिल्मफेयर बेस्ट अॅक्टर (क्रिटिक्स) चा अवॉर्ड मिळाला आहे यावरून तुम्हाला हा किती चांगला चित्रपट आहे याचा अंदाज आला असेल. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही संजय मिश्रांच्या अभिनयाचे फॅन व्हाल. साल 2013 मध्ये आलेला हा चित्रपट Voot, Netflix, Amazon Prime Video आणि Jiocinema वर बघता येईल.
3. Kadvi Hawa
Kadvi Hawa चित्रपट झी5 वर बघता येईल. हा चित्रपट शेतकरी आत्महत्या आणि वातावरणातील बदल सारख्या गंभीर मुद्द्यांना हात घालतो. ज्यात संजय मिश्रा यांची महत्वाची भूमिका आहे. चित्रपट प्रेमींसह समीक्षकांना देखील हा चित्रपट खूप आवडला होता. हा चित्रपट शेती करताना येणाऱ्या समस्यांची गोष्ट सांगतो.
4. Ekkees Tareekh Shubh Muhurat
हा चित्रपट जियोसिनेमा, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि युट्युबवर बघता येईल. दिग्दर्शक पवन के चौहान यांचा हा एक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यात लग्न या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. चित्रपट तुम्हाला हसवतो आणि सत्य पण दाखवतो. हे देखील वाचा: New OTT Releases: TVF चा गोड वेब सीरिजचा तिसरा सिझन आला; या विकेंडला हे चित्रपट येतील ओटीटीवर
5. Total Dhamaal
फिल्म ‘टोटल धमाल’ मध्ये संजय मिश्रा एक सह-कलाकार आहेत. परंतु मल्टी स्टार चित्रपट असून देखील संजय मिश्रांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. ‘धमाल’ फ्रॅन्चायजी मधील हा तिसरा चित्रपट आहे ज्यात रितेश देशमुख, अजय देवगन, अरशद वारसी, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, संजय मिश्रा, जावेद जाफरी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम करता येईल.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.