Ultraviolette F77 इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच; सिंगल चार्जवर धावेल 307km

बँगलोरमधील ईव्ही स्टार्टअप अल्ट्रावॉयलेटनं आज आपली बहुप्रतीक्षित Ultraviolette F77 electric motorcycle लाँच केली आहे. कंपनीनुसार, ही भारतातील सर्वात फास्ट इलेक्ट्रिक बाइक आहे. जी सिंगल चार्जवर 307 किमीची रेंज देऊ शकते. प्राइस पाहता ही भारतातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक बाइक आहे. कंपनीनुसार ही बाइक तीन ट्रिम्स- शॅडो , लाइटनिंग आणि लेजरमध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच, कंपनीनं या ई-बाइकचं स्पेशल एडिशन सादर करण्याची घोषणा देखील केली आहे. पुढे तुम्हाला या सुपर फास्ट स्पीड आणि दीर्घ रेंज असलेल्या ई-बाइकच्या किंमत, बुकिंग, डिजाइन आणि फीचर्सची माहिती दिली आहे.

डिजाइन

ई-बाइकच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर कंपनीनं ही एयरोडायनॅमिक डिजाइनसह बाजारात आणली आहे. यात स्लीक हेडलॅम्प्स, बल्कि साइड फेयरिंग, अलॉय व्हील आणि पुढे व मागे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. ही तीन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली ओप्पो स्मार्टफोन्सची दणक्यात एंट्री; 16GB RAM सह OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ लाँच

प्राइस आणि बुकिंग

कंपनीनं ही बाइक 3.8 लाख रुपयांची बेस किंमतीत सादर केली आहे. ही प्राइस F77 Original व्हेरिएंटची आहे, तर 307 किमी रेंज असलेल्या F77 Recon व्हेरिएंटची किंमत 4.55 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. तसेच Ultraviolette Automotive नं या ई-बाइकचा एक special edition model देखील सादर केला आहे, ज्याची प्राइस Rs 5.5 lakh (ex-showroom Delhi) आहे. तसेच, या बाइकची बुकिंग 23 ऑक्टोबरला सुरु केली होती आणि ही अजूनही 10 हजार रुपये देऊन बुक करता येईल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, ही बाइक 38.8 bhp आणि 95 Nm पीक टॉर्कसह येते. तसेच बाइकचा टॉप स्पीड ताशी 147 किमी पर्यंतचा आहे. तसेच कंपनीनं यात तीन राइडिंग मोड दिले आहेत, ज्यांची नावे ग्लाइड, कॉम्बॅट आणि बॅलिस्टिक अशी ठेवण्यात आली आहेत. तसेच 30.2kW ची पावर, 100Nm टॉर्कसह सिंगल चार्जमध्ये बाइकला 307km ची रेंज मिळते. हे देखील वाचा: Airtel या 2 रिचार्जमध्ये देतेय ते बेनिफिट जे Jio च्या कुठल्याही प्लॅनमध्ये मिळत नाहीत

तुम्ही ही बाइक दोन प्रकारच्या चार्जरनं चार्ज करू शकता, एक स्टँडर्ड चार्जर जो तुमची बाइक 35km/hr वेगानं चार्ज करू शकतो आणि एक बूस्ट चार्जर आहे जो तुमची बाइक 75km/hr वेगानं चार्ज करू शकतो. तुम्ही तुमचा बूस्ट चार्जर तुमच्या बाइकवर सोबत बाळगू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here