e-Shram Card साठी कसा करायचा मोफत अर्ज; महिन्याला मिळवा 3 हजार, 2 लाखांचं विमा संरक्षण

देशाच्या प्रगतीमध्ये भारतातील श्रमिकांचे आणि कामगारांचे महत्वपूर्ण योगदान आहे. अनेक योजना आणि प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी मजूर बांधवांचे योगदान कमी आखता येणार नाही. अशा कामगार आणि मजुरांना सुख-सुविधा देण्याच्या उद्देशाने सरकारनं e-shram card ची सुरुवात केली आहे ज्यातून अनेक फायदे मिळतात. या ई-श्रम कार्डचा फायदा काय आणि कशाप्रकारे हे मोफत बनवायचं, याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

e-Shram Card चे फायदे

ई-श्रम कार्ड खासकरून त्या लोकांसाठी सुरु करण्यात आलं आहे ज्यांची उपजीविका मजुरीवर अवलंबुन आहे. या स्कीम अंतगर्त मजूर आणि कामगारांना अनेक लाभ मिळतात ज्यात Pradhan Mantri Suraksha Bima Yojana अंतगर्त 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा कव्हर प्रमुख आहे. एखाद्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाल्यास 2 लाख आणि अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळेल. फक्त इतकेच नव्हे तर सरकार वेळोवेळी e-Shram Card धारकांच्या bank account मध्ये काही रक्कम देखील ट्रांसफर करेल तसेच 60 वर्ष वयाच्या वरील श्रमिकांना 3000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळेल. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

असे मजूर ज्यांच्याकडे ई-श्रम कार्ड आहे त्यानं सरकारकडून रोजगार दिला जातो तसेच अनेक योजनांमध्ये सामील केले जाते. गैरसमज होऊ नये म्हणून सांगत आहोत की ई-श्रम कार्डचा फायदा ज्या मजूर व कामगारांना दिला जात आहे त्यात मजूर, लेबर, फेरीवाले, रिक्शा चालक, न्हावी, धोबी, शिंपी, मोची, सफाई कर्मचारी, गार्ड, ट्रेलर, ड्रायव्हर, डिलिव्हरी एजंट, दुकानदार, फळ, भाजी आणि दूध विक्रेते तसेच नर्सिंग सेवेतील लोकांसह अनेकांचा समावेश करण्यात आला आहे.

असं बनवा e-Shram Card

– ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम श्रमिक कार्डच्या अधिकृत वेबसाइट eshram.gov.in वर जा. आताच जाण्यासाठी (इथे क्लिक करा)

– कामगार विभागाच्या वेबसाइटच्या होम पेजवर Registration on e-Shram चा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

– इथे Self Registration करावं लागेल, यासाठी आधार कार्डशी लिंक्ड मोबाइल नंबर टाकावा लागेल.

– नंबर दिल्यानंतर त्या फोन नंबरवर ओटीपी येईल, जो वेबसाइटवर सबमिट करावा लागेल. ओटीपी व्हेरिफाय होताच तुम्ही रजिस्टर व्हाल.

– रजिस्टर पेजवर आल्यानंतर मागण्यात आलेली माहिती नीट भरा. यात नाव, पत्ता, काम, बँक अकांउट इत्यादीचा समवेश असेल.

– सर्व डिटेल्स भरल्यानंतर Submit बटनवर क्लिक करा. तुमचं E-Shram Card बनेल ज्यात 12 अंकी UAN म्हणजे Universal Account Number मिळेल.

लक्षात असू दे e-Shram Card साठी सरकारकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आणि हे पूर्णपणे फ्री आहे. हे बनवणे खूप सोपं काम आहे आणि यासाठी सायबर कॅफे किंवा इतर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. वर सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही स्वतःहून मोबाइलच्या माध्यमातून घर बसल्या श्रमिक कार्ड बनवू शकता आणि कार्ड फोनमध्ये डाउनलोड करू शकता. हे देखील वाचा: पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here