काही दिवसांपूर्वी SAMSUNG नं आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन सादर केला होता. सॅमसंग ब्रँड आणि कमी किंमत या दोन गोष्टींमुळे हा स्मार्टफोन खूप लोकप्रिय ठरला आहे. आता हाच SAMSUNG Galaxy F23 5G स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टवर सध्या Electronics Sale सुरु आहे. हा सेल 21 ऑगस्टपासून 25 ऑगस्टपर्यंत सुरु राहील. सेल दरम्यान फ्लिपकार्टवर मोबाइल फोन्स आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर शानदार डील मिळत आहे. पुढे आम्ही तुम्हाला SAMSUNG Galaxy F23 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्स, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची सविस्तर माहिती दिली आहे.
SAMSUNG Galaxy F23 5G वरील ऑफर
SAMSUNG Galaxy F23 5G स्मार्टफोन 14,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फोन विकत घेताना SBI च्या क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. म्हणजे हा स्मार्टफोन फक्त 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगचा हा फोन फ्लिपकार्टवरून विकत घेतल्यास Disney+ Hotstar चं फ्री सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. तसेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून आणखी सूट मिळवू शकता, ज्यामुळे या हँडसेटची किंमत खूप कमी होईल.
सॅमसंगचा हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. SAMSUNG Galaxy F23 5G स्मार्टफोनचा 4GB व्हेरिएंट 14,999 रुपये आणि 6GB रॅम व्हेरिएंट 15,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. एसबीआय क्रेडिट कार्डची ऑफर या सॅमसंग फोनच्या दोन्ही व्हेरिएंटवर उपलब्ध आहे.
Samsung Galaxy F23 5G चे स्पेसिफिकेशन्स
- 6.6-इंच FHD+ IPS LCD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट
- Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर
- 6GB पर्यंत रॅम, 128GB स्टोरेज
- 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
- 13MP सेल्फी कॅमेरा
- 5,000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग
Samsung Galaxy F23 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि Corning Gorilla Glass च्या प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉमचा Snapdragon 750G चिपसेट मिळतो. सोबतीला Adreno 619 GPU देण्यात आला आहे. हा फोन Android 12 आधारित सॅमसंगच्या OneUI 4.1 वर चालतो.
Samsung Galaxy F23 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.
Samsung Galaxy F23 स्मार्टफोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. तसेच हा फोन Dolby Atmos आणि Samsung Pay ला देखील सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, dual-band Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, आणि USB Type-C पोर्ट मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.















