ICC T20 World Cup 2022: भारतीयांसाठी सध्या खऱ्या अर्थाने सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. दसरा जवळ आहे आणि दिवाळीच्या आधी 16 ऑक्टोबरपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरु होणार आहे जो 13 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या वर्ल्ड क्रिकेट स्पर्धेत जगभरातील 16 संघ सहभाग घेतील आणि T20 World Cup 2022 मिळवण्यासाठी एकमेकांशी भिडतील. क्रिकेटवरील भारतीयांचं प्रेम लपलेलं नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर दमदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे टी20 वर्ल्ड 2022 जिंकण्यासाठी भारतीय संघ मोठा दावेदार आहे. हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे त्यामुळे भारतीयांना याचा आनंद टीव्ही आणि मोबाईलवरून घ्यावा लागेल. त्यामुळे आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी टी20 वर्ल्ड कप 2022 च्या शेड्यूल तसेच इंडियन क्रिकेट टीम प्लेयर्सच्या यादीसह तुम्ही कधी, कुठे आणि कशाप्रकारे संपूर्ण ICC T20 World Cup 2022 तुमच्या मोबाइलवर लाइव्ह बघू शकता म्हणजे याची Live Streaming करू शकता याची माहिती घेऊन आलो आहोत.
India T20 World Cup Team
Rohit Sharma (कर्णधार)
KL Rahul
Virat Kohli
Suryakumar Yadav
Deepak Hooda
Rishabh Pant
Dinesh Karthik
Hardik Pandya
R. Ashwin
Yuzvendra Chahal
Axar Patel
Jasprit Bumrah
Bhuvneshwar Kumar
Harshal Patel
Arshdeep Singh
Standby Players: Mohammad Shami, Shreyas Iyer, Ravi Bishnoi आणि Deepak Chahar देखील आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघात सहभागी होतील परंतु स्टँडबायवर असतील. हे देखील वाचा: Amazon Happiness Upgrade Days Sale: स्मार्टफोन, टॅबलेटसह लॅपटॉपवर मिळतेय जबरदस्त सूट
T20 World Cup भारतात लाइव्ह कसा बघायचा
क्रिकेट वर्ल्ड कप 2022 भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध होईल. या वर्ल्ड कपच्या सर्व मॅचेस Star Sports 1, Star Sports 2 आणि Star Sports 3 लाइव्ह दिसतील. तसेच क्रिकेट मॅच आनलाईन पाहायची असेल तर T20 World Cup live streaming लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Disney+HotStar वर होईल जी डिज्नी+ हॉटस्टार विआयपी तसेच डिज्नी+ हॉटस्टार प्रीमियम मेंबरशिप दोन्हीवर बघता येईल.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे साल 2015 ते 2023 पर्यंतच्या सर्व आयसीसी इव्हेंट भारतात दाखवण्याचे अधिकार आहेत. तसेच दूरदर्शन (Doordarshan) देखील world cup games चं live telecast करेल. फक्त भारतात नव्ह तर दूरदर्शन Nepal, Sri Lanka, Maldives, Bhutan आणि Bangladesh मध्ये देखील T20 World Cup चं लाइव्ह टेलीकास्ट करेल.
Best Apps to Watch T20 World Cup 2022 LIVE on Mobile
- Disney+ HotStar
- JioTV
- YuppTV
- SonyLiv
- Tata Sky Mobile
वरील 5 बेस्ट अॅप आहेत ज्यांच्यावर टी20 वर्ल्ड कप 2022 लाइव्ह बघता येईल. हे अॅप्लीकेशन्स कोणत्याही अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा आयफोनवर डाउनलोड करता येतील आणि अकाऊंट बनवून क्रिकेट मॅच लाइव्ह बघता येईल. प्रत्येक अॅपचे वेगवेगळे नियम आहेत आणि यांच्यावर किक्रेट मॅच लाइव्ह बघण्यासाठी सब्सक्रिप्शन आवश्यक आहे. हे देखील वाचा: Breaking: स्वस्त Jio Laptop ची विक्री झाली सुरु; कोणताही गाजावाजा न करता मार्केट प्लेसवर लिस्ट
ICC Men’s T20 World Cup 2022 मध्ये खेळत असलेल्या सर्व देशांच्या संघांची माहिती तसेच मॅच शेड्यूल सोबतच या क्रिकेट टूर्नामेंट संबंधित सर्व बातम्या आणि लाइव्ह अपडेटसाठी (इथे क्लिक करा)