रेडमीचा सर्वात स्वस्त 5G फोन? पुढील आठवड्यात भारतात येतोय Redmi 11 Prime 5G, असे असतील फीचर्स

Xiaomi Redmi नं आपल्या चाहत्यांना भेट देत नवीन मोबाइल रेडमी 11 प्राइम 5जी फोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की Redmi 11 Prime 5G Phone 6 सप्टेंबरला भारतात लाँच केला जाईल. MediaTek Dimensity 700 ची पावर असलेला हा स्मार्टफोन शानदार फीचर्स व स्पेसिफिकेशन्ससह स्वस्तात सादर केला जाईल. कंपनीची ही नंबर सीरिज सर्वात स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते, त्यामुळे हा अपकमिंग स्मार्टफोन रेडमीचा सर्वात स्वस्त 5G फोन ठरू शकतो.

Redmi 11 Prime 5G 6 सप्टेंबरला भारतात लाँच होईल. कंपनीनं या फोनचं प्रोडक्ट पेज शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह केलं आहे ज्यात फोनच्या फोटोज सोबतच अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील शेयर करण्यात आले आहेत. 6 सप्टेंबरला रेडमी 11 प्राइम 5जी सह अन्य मॉडेल देखील सादर केले जातील, अशी देखील चर्चा आहे. रेडमी 11 प्राइम 5जी 6 सप्टेंबरला लाँच झाल्यानंतर काही दिवसांनी भारतात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स; 64MP Camera असलेला Redmi Note 11 SE भारतात लाँच

Redmi 11 Prime 5G चे स्पेसिफिकेशन्स

काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की आगामी Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आलेल्या Redmi 10 5G सारखा असू शकतो. फोनची डिजाईन पाहता, रेडमी 11 प्राइम 5जी फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच केला जाईल ज्यात नॅरो चिन पार्ट बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनलवर डावीकडे ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात मोठ्या आकाराच्या कॅमेरा लेन्स आहेत. बॅक पॅनल थोडासा रगेड आहे पूर्णपणे सपाट नाही. तसेच मागे इतर कोणताही सेन्सर देण्यात आला नाही.

Redmi 11 Prime 5G चे स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमीनं खुलासा केला आहे की हा स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर लाँच केला जाईल. फोनमध्ये दोन सिम वापरता येतील तसेच दोन्हीवर 5जी नेटवर्क सपोर्ट मिळेल. फोटोग्राफीसाठी हा मोबाइल फोन 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करेल तसे पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. हे देखील वाचा: Xiaomi चे स्वस्त Smart TV लाँच; शानदार फीचर्ससह Xiaomi Smart TV X Series चा 43-इंचाचा मॉडेल सादर

भारतात लाँच होणाऱ्या Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला जाईल, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 90Hz असू शकतो. रेडमीचा आगामी 11 Prime 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित MIUI 13 वर चालेल. फोनमध्ये सेल्फीसाठी 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. रेडमीच्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट स्कॅनर आणि एआय फेस अनलॉक मिळेल. हा रेडमी मोबाइल दोन पेक्षा जास्त रॅम व्हेरिएंट्समध्ये एंट्री करू शकतो. Redmi 11 Prime 5G प्राइस व फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाल्यास वाचकांपर्यंत पोहोचवली जाईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here