Xiaomi च्या सब ब्रँड Redmi नं आज भारतात आपलं शक्तिप्रदर्शन करत एकत्र नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीचे Redmi A1, Redmi 11 Prime 4G आणि Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. हे तिन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स देतात. यातील रेडमी ए1 एक एंट्री लेव्हल डिवायस आहे तर रेडमी 11 प्राइम 4जी आणि 5जी मॉडेल दमदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहेत.
Redmi 11 Prime 5G Price
रेडमी 11 प्राइम 5जी फोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 13,499 रुपये तसेच 15,999 रुपये आहे. Redmi 11 Prime 5G Sale 9 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सुरु होईल तसेच आयसीआयसीआय कार्ड युजर्सना या फोनवर 1,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट सूट मिळेल. हे देखील वाचा: फक्त 6,499 रुपयांमध्ये Xiaomi चा नवीन स्मार्टफोन Redmi A1 लाँच; स्वस्तात देखील शानदार फिचर
Redmi 11 Prime 5G Specifications
Redmi 11 Prime 5G Display
रेडमी 11 प्राइम 4जी आणि 5जी मॉडेल दोन्ही स्मार्टफोन्सचा फ्रंट लुक जवळपास एक सारखा आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. वॉटरड्रॉप नॉच असलेली ही कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. हे स्मार्टफोन 20.7ः9 अॅस्पेक्ट रेशियोवर बनलेले आहेत तसेच 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतात.
Redmi 11 Prime 5G Processor
रेडमी 11 प्राइम 5जी फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो.
Redmi 11 Prime 5G Camera
फोटोग्राफीसाठी रेडमी 11 प्राइम 5जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल मोनोक्रोम सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi 11 Prime 5G Battery
पावर बॅकअपसाठी रेडमी 11 प्राइम 5जी मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनी आपल्या या स्मार्टफोनसह 22.5वॉट चार्जर देखील बॉक्समध्ये देत आहे. हे देखील वाचा: स्कूटरच्या किंमतीत इलेक्ट्रिक बाइक; 150Km च्या तुफान रेंजसह HOP OXO इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच
Redmi 11 Prime 4G Price
रेडमी 11 प्राइम 4जी स्मार्टफोन देखील भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची प्राइस 12,999 रुपये आहे. तर Redmi 11 Prime 4G 6GB RAM + 128GB Storage मॉडेल 14,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. रेडमी 11 प्राइमच्या सेल व ऑफरची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.
Redmi 11 Prime 4G Specifications
रेडमी 11 प्राइम 4जी फोन 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशन बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर चालतो तसेच मोबाइलमध्ये RAM Booster फीचर आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळते. 5जी मॉडेल प्रमाणे यात 6.58 इंच 90हर्ट्ज डिस्प्ले मिळतो.

















