Redmi A1 Launch: Xiaomi नं आपल्या सबब्रँड Redmi अंतर्गत एक नव्हे तर तीन नवीन रेडमी स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. हे मोबाइल फोन्स Redmi A1, Redmi 11 Prime 5G आणि Redmi 11 Prime 4G नावानं भारतीयांच्या भेटीला आले आहेत. हे तिन्ही स्वस्त रेडमी फोन्स आहेत जे लो बजेटमध्ये आले आहेत तसेच रेडमी ए1 स्मार्टफोन यातील सर्वात कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. पुढे Redmi A1 Price सोबतच याच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती आम्ही दिली आहे.
Redmi A1 Specifications
रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशन, 20:9 अॅस्पेक्ट रेशियो आणि 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे ज्याच्या तीन कडा नॅरो बेजल्स आहेत तर तळाला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Redmi A1 चे डायमेंशन 164.9x 76.75×9.09 एमएम आणि वजन 192 ग्राम आहे. हे देखील वाचा: काळजी न घेतल्यास तुमच्यावरही येऊ शकते ही वेळ; …म्हणून व्हॉट्सअॅपनं बॅन केलं 23 लाख भारतीयांना

Redmi A1 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो, त्यामुळे जुन्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स पेक्षा चांगला अनुभव मिळू शकतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे. हा रेडमी फोन LPDDR4X RAM आणि eMMC 5.1 Storage फीचरला सपोर्ट करतो तसेच फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.
फोटोग्राफीसाठी रेडमी ए1 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली एक एआय लेन्स पण आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Redmi A1 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक सहित ब्लूटूथ 5.0 तथा 2.5 वायफाय सारखे फीचर्स मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. हे देखील वाचा: स्कूटरच्या किंमतीत इलेक्ट्रिक बाइक; 150Km च्या तुफान रेंजसह HOP OXO इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच
Redmi A1 Price In India
Redmi A1 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात लाँच झाला आहे, ज्यात 2GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज मिळते. या नव्या रेडमी स्मार्टफोनची किंमत 6,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट लाइट ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि लाइट ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. या स्मार्टफोनची विक्री येत्या 9 सप्टेंबरला दुपारी 4 वाजल्यापासून Mi.com, Amazon India, Mi Home stores आणि रिटेल स्टोर्सवर सुरु होईल.
















