Ola नं अलीकडेच आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) Ola S1 Air भारतीय मार्केटमध्ये लाँच केली होती, जिची किंमत 84,999 रुपये आहे. आता एक नवीन स्टार्टअपनं ओलाच्या इलेक्ट्रकि स्कूटर्सला टक्कर देण्यासाठी आपली Baaz e-scooter फक्त 35,000 रुपये (ex-showroom) मध्ये लाँच करून बाजारात धुमाकूळ घातला आहे. EV startup Baaz Bike नं battery-swapping technology सह आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटी सादर केली आहे. ही नवीन ई-स्कूटर IIT दिल्लीच्या माजी विद्यार्थ्यांनी बनवली आहे जे मूळ कंपनी ElecTorq Technologies चे संस्थापक देखील आहेत. चला जाणून घेऊया या ई-स्कूटरच्या फीचर्स आणि रेंजसह सर्व माहिती.
किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनीचा जुगाड
Made-in-India e-scooter कमी किंमतीत सादर केला गेला आहे. कंपनीनं प्रामुख्यानं डिलिव्हरी एजंट्स आणि छोट्या उद्योजकांसाठी डिजाइन केली आहे. Baaz e-scooter ची किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनीनं ही बॅटरीविना सादर केली आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला Electric scooter खरेदी केल्यावर बॅटरी वेगळी घ्यावी लागेल. हे देखील वाचा: नोकियाचा स्वस्त 5G फोन येतोय भारतीयांच्या भेटीला; 6GB रॅमसह होईल Nokia G60 5G ची एंट्री
या इलेक्ट्रिक स्कूटरची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 35,000 रुपये आहे. तसेच, कंपनीनुसार इलेक्ट्रिक स्कूटरमधून बॅटरी वेगळी करून स्कूटरची किंमत कमी करण्यात आली आहे, त्यामुळे ही स्कूटी रायडरसाठी किफायतशीर ठरेल.
भाड्यानं मिळेल ई-स्कूटर
Baaz Bikes ची किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर भाड्यानं घेऊन देखील चालवता येईल. तुम्ही ही ई-बाइक Baaz dealerships च्या माध्यमातून pay-as-you-move model स्कीम अंतगर्त काही किंमत देऊन रोज भाड्यानं घेऊन रोजच्या कामासाठी वापरता येईल.
लायसन्सची गरज नाही
बाज स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही Driving Licence ची गरज नाही कारण ही एक स्लो स्पीड स्कूटर आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 25 किलोमीटर आहे जो एक इलेक्ट्रिक सायकल (Electric Cycle) मध्ये मिळतो. त्यामुळे ही चालवण्यासाठी DL सोबतच कोणत्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही. कंपनीनं हिच्या रेंजचा खुलासा मात्र केला नाही. या स्कूटरची रुंदी 680 mm, उंची 1052 mm आणि लांबी 1624 mm आहे. हे देखील वाचा: 12 महिने चालणारा BSNL चा सर्वात स्वस्त Recharge, डेटा आणि कॉलिंगसह एसएमएस देखील फ्री
Baaz electric scooter specifications
नवीन बाज इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ड्युअल फ्रंट फोर्क आणि ड्युअल रियर शॉक अब्जॉर्बर मिळतात. ही ई-स्कूटर बॅटरी पॅक सपोर्टेड असेल, ज्यांना कंपनी Baaz Energy Pods म्हणते. स्वॅपेबल बॅटरीचं वजन 8.2kgs असेल यात 1082Wh एनर्जी डेंसिटी मिळेल. पॉड्सना IP68 वेदरप्रूफिंग मिळाली आहे. तसेच पॉड्सचं ऑपरेटिंग तापमान 45 डिग्री सेल्सियस आहे.
कंपनीनं माहिती दिली आहे की चार्जिंगची सुविधा एर्गोनॉमिक पद्धतीनं डिजाइन करण्यात आलेल्या अॅटोमॅटिक स्टेशन्सना पुरवली जाईल. स्टेशनमध्ये एकावेळी 9 बॅटरीच पर्यंतची सुविधा मिळेल. तसेच Baaz बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क देखील IP65 वेदरप्रूफिंग सर्टिफिकेशननी सुस्सज आहे. इतर सुविधांमध्ये अँटी-टॅम्परिंग सोल्युशन, स्मोक आणि वॉटर सेन्सर, एचवीएसी कंट्रोल्ड चार्जिंग स्लॉट इत्यांदीचा समावेश आहे.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
















