आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु

Jio Phone 5G Specifications Exclusive 5000mAh Battery 13MP Camera Know More Details

5G Services भारतात लाँच झाल्यापासून प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या परिसरात 5G Network ची वाट पाहत आहेत. सध्या Reliance Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्या भारतात 5जीचा विस्तार करत आहेत. आता रिलायन्स जियोनं ‘5G in India’ साठी आणखी दोन पाऊले पुढे टाकत देशातील आणखी दोन शहरे Bengaluru आणि Hyderabad मध्ये आपली Jio True 5G services सुरु केली आहे. आता भारतातील एकूण 8 शहरांमध्ये रिलायन्स जियो 5जी सर्व्हिसचा लाभ घेता येईल आणि 1 Gbps+ स्पीडवर 5G DATA वापरता येईल.

Jio True 5G

रिलायन्स जियोनं उद्या म्हणजे 10 नोव्हेंबरला Bengaluru आणि Hyderabad मध्ये देखील आपल्या 5जी सर्व्हिसेसची घोषणा केली आहे. आता बेंगळुरू आणि हैद्राबाद दोन्ही शहरांमध्ये Jio Mobile Number वापरणाऱ्या युजर्सना जियो ट्रू 5जी वापरता येईल. या दोन्ही शहरांमध्ये Jio Welcome Offer सुरु झाली आहे. त्यामुळे रिलायन्स जियो युजर आपल्या फोनमध्ये 5जी इंटरनेटचा आनंद घेऊ शकतील. ग्राहकांना अनलिमिटेड 5जी डेटा मिळेल ज्यात 1जीबीपीएस स्पीडवर इंटरनेट चालेल. हे देखील वाचा: Mirzapur Season 3 रिलीज डेट, ट्रेलर आणि स्ट्रीमिंग टाइम; जाणून घ्या संपूर्ण माहिती

jio 5g works on 4g sim

Jio Welcome Offer

जियो वेलकम ऑफर पाहता हा Jio True 5G services चा ट्रायल बेस्ड प्रोग्राम आहे ज्यात जियो मोबाइल नंबर युजर्सना मोफत 5जी वापरण्याची संधी मिळते. यासाठी वेगळा प्लॅन विकत घ्यावा लागत नाही तसेच कोणतंही अतिरिक्त शुल्क न देता जियो युजर 5जी इंटरनेट वापरू शकतात. Jio Welcome Offer ची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात 1 Gbps स्पीड असलेला अनलिमिटेड 5G DATA मिळतो.

Jio 5G

आता देश के एकूण 8 शहरांमध्ये जियो 5जी सर्व्हिस वापरता येईल. देशाची राजधानी Delhi, Mumbai, Kolkata, Chennai, Varanasi आणि Nathdwara नंतर आता Bengaluru आणि Hyderabad मध्ये जियो 5जी सर्व्हिस सुरु झाली आहे आणि या शहरांमध्ये राहणारे युजर्स 5जी नेटवर्क आणि 5जी इंटरनेटचा आनंद घेऊ शकतील. हे देखील वाचा: महागडे फीचर्स परंतु परवडणारी किंमत; शाओमीला हद्दपार करण्यासाठी येतोय OnePlus Nord CE 3 5G

Jio Welcome Offer कशी मिळवायची

Jio 5G चा वापरण्यासाठी जियो वेलकम ऑफर टेस्टिंगमध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे, त्यासाठी:

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये MyJio App उघडा
  • अ‍ॅपच्या वरच्या भागात Jio Welcome Offer बॅनर दिसेल. जर कोणताही पर्याय नसेल तर त्याचा अर्थ तुमच्या मोबाइल नंबरसाठी इन्वाइट आतापर्यंत आलं नाही.
  • त्यानंतर, ‘I Am Interested’ बटन वर क्लिक करा
  • नेक्स्ट स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘Done’ वर टॅप करा
  • हे झाल्यावर 5G टेस्टिंगसाठी तुमची निवड झाल्याची सूचना तुम्हाला दिली जाईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here