लीकमधून OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स आले समोर

OnePlus Nord CE 2 5G

एकेकाळी वर्षातून एकच फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन सादर करणारी कंपनी OnePlus आता आपल्या नॉर्ड सीरिजच्या माध्यमातून मिडरेंजमध्ये धुमाकूळ घालत आहे. आता कंपनी OnePlus Nord CE 3 5G Phone ची तयारी करत असल्याची बातमी आली आहे, जो लवकरच बाजारात येऊ शकतो. वनप्लसनं अजूनतरी नॉर्ड सीई 3 5जी फोन लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु एक लीकमध्ये OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हा वनप्लस मोबाइल 108MP Camera, Qualcomm Snapdragon 695 SoC आणि 67W Fast Charging सारख्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच होऊ शकतो.

OnePlus Nord CE 3 5G Price

वनप्लस नॉर्ड सीई 3 5जीची माहिती ऑनलीक्सच्या माध्यमातून समोर आली आहे. हा एक मिडबजेट वनप्लस फोन असेल ज्याची किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असू शकते, असं सांगण्यात आलं आहे. ही फोनची इंडियन प्राइस असेल म्हणजे OnePlus Nord CE 3 5G स्मार्टफोन भारतात 25 हजारांच्या बजेटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे. हे देखील वाचा: भन्नाट ऑफर! बजेट फोनवरच मिळतोय डिस्काउंट; अशी आहे Realme Narzo 50 5G वरील डील

OnePlus Nord CE 2 5G

OnePlus Nord CE 3 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.7-inch FHD+ Display
  • 120Hz Refresh Rate
  • Qualcomm Snapdragon 695 5G
  • 12 RAM + 256 GB Storage
  • 108MP Triple Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 67W charging speed
OnePlus Nord CE 2 5G

वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोन 6.7 इंचाच्या लार्ज फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असेल ज्यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो. OnePlus Nord CE 2 5G फोनच्या स्क्रीन मध्ये अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर केला गेला आहे, त्यामुळे OnePlus Nord CE 3 5G ची स्क्रीन थोडी डाउनग्रेडच वाटते.

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 3 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असू शकतो, जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या वनप्लस मोबाइल फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: स्वस्त 5G Phone साठी OPPO चा एकदम नवीन फोन; लाँच पूर्वीच A1 Pro चे फोटोज आणि स्पेक्स लीक

OnePlus Nord CE 2 5G

OnePlus Nord CE 3 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज तसेच 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. पावर बॅकअपसाठी वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी असल्याचं लीकमधून आलं आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here