चेक ऑटोमेकर Skoda भारतीय बाजारात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी नवीन मॉडेल लाँच करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी येत्या 12 महिन्यांत किमान तीन ते पाच नवीन प्रोडक्ट लाँच करण्याची योजना बनवत आहे. इतकंच नव्हे तर, स्कोडा एक नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही देखील डेव्हलप करत आहे, जी 2025 पर्यंत लाँच केली जाऊ शकते.
नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही (compact SUV) सादर करण्याआधी स्कोडा आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही Skoda Enyaq iV, नवीन सुपर्ब सेडान आणि लिमिटेड एडिशन Octavia RS iV लाँच करण्याची तयारी करत आहे. हे मॉडेल्स सीबीयू किंवा सीकेडी यूनिट म्हणून सादर केले जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. Enyaq iV च्या माध्यमातून देशातील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा उद्देश स्कोडाचा आहे. ही कार 2023 च्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. हे देखील वाचा: रेडमीला सडेतोड उत्तर देण्याची तयारी; कमी किंमत, दमदार फीचर्ससह Realme 10 5G होऊ शकतो लाँच
Skoda Enyaq iV चे फीचर्स
भारतात स्कोडा टॉप-स्पेक Enyaq iV 80X लाँच करू शकते, जी 77kWh बॅटरी पॅकसह येते आणि 125kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ही कार ड्युअल मोटरसह येते. यात प्रत्येक एक्सलवर एक AWD (ऑल-व्हील-ड्राईव्ह) सेटअप आणि एकूण 265bhp ची पावर मिळते. या इलेक्ट्रिक एसयूव्ही बद्दल कंपनीचा दावा आहे की ही फक्त 6.9 सेकंदात 0-100 km ताशी वेग गाठू शकते. हा मॉडेल 513km पर्यंतच्या WLTP रेटेड रेंजसह येतो, ज्यामुळे ही कार या सेगमेंटमधील सर्वात जास्त रेंज देणारी EV बनू शकते. हे देखील वाचा: आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु
Skoda Enyaq iV इलेक्ट्रिक एसयूव्ही 19-इंच प्रोटियस अलॉय व्हील्स, 13-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, अॅम्बिएंट लाइटिंग, लेदर-रॅपिड स्टीयरिंग व्हील आणि अपहोल्स्ट्रीसह बाजारात येईल. ज्यात लेदर आणि मायक्रोफायबर फॅब्रिकचं मिश्रण आहे. स्कोडा इलेक्ट्रिक एसयूव्ही कमी किंमतीत सादर करण्यासाठी कंपनी लो-स्पेक, टू-व्हील ड्राईव्ह मॉडेल देखील सादर करू शकते. स्कोडा Enyaq iV वोक्सवॅगन समूहच्या MEB born electric platform वर आधारित आहे. प्लॅटफॉर्म सिंगल-मोटर, RWD आणि ड्युअल-मोटर AWD सेटअपसह कॉम्पिटेबल आहे, दोन्ही Enyaq iV सह उपलब्ध आहेत. Skoda Enyaq iV इलेक्ट्रिक 4,648mm लांब, 1879mm रुंद आणि 1,616mm उंच आहे आणि हीचा व्हीलबेस 2,765mm आहे.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.















