5जी मोटो मॉड सह लॉन्च झाला 6-इंचाचा डिस्प्ले आणि 4जीबी रॅम वाला मोटो झेड3, या फोन मधील इंटरनेट चालेल 5जी स्पीड वर

मोटोरोला बद्दल कित्येक दिवसांपासून बातम्या येत होत्या की कंपनी आपल्या वन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे आणि लवकरच मोटोरोला वन, मोटोरोला वन पावर स्मार्टफोन सोबत मोटो झेड3 लॉन्च करेल. कालच मोटोरोला ने आपली ‘वन सीरीज’ सादर केली नाही पण कंपनी ने मोठी स्क्रीन असलेला दमदार स्मार्टफोन मोटो झेड3 आणला आहे. मोटोरोला ने मोटो झेड3 अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला आहे जो सध्या अमेरिकेत सेल साठी उपलब्ध होईल.

मोटोरोला मोटो झेड3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह ग्लास सँडविच डिजाईन सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2,160 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6-इंचाची ओएलईडी ​स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 8.1 ओरियो सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालतो.

मोटो झेड3 मध्ये कंपनी ने 4जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मधील दोन्ही रियर कॅमेरा सेंसर 12-मेगापिक्सल चे आहेत जे एलईडी फ्लॅश सोबत येतात. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटोरोला ने आपला हा लेटेस्ट स्मार्टफोन 5जी मोटो मॉड सोबत आणला आहे. विशेष म्हणजे या मॉड मुळे मोटो झेड3 जगातील पहिला असा स्मार्टफोन ठरला आहे जो 5जी अपग्रेड ला सपोर्ट करू शकेल. 5जी मोटो मॉड मध्ये स्नॅपड्रॅगन एक्स50 आहे आणि पावर बॅकअप साठी यात 2,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. 5जी मोटो मॉड कंपनी पुढल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये बाजारात आणेल.

मोटो झेड3 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. फोन 3 एनएफसी व यूएसबी टाइप सी पोर्ट सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोन मध्ये साइड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,000एमएएच बॅटरी ला सपोर्ट करतो.

मोटोरोला मोटो झेड3 अमेरिकेत ब्लॅक कलर मध्ये सादर झाला आहे तिथे याची किंमत 480 यूएस डॉलर ठेवण्यात आली आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 33,000 रुपये आहे. तसेच पुढल्या वर्षी बाजारात येणार्‍या 5जी मोटो मॉड ची किंमत कंपनीने सांगितली नाही. या 5जी मोटो मॉड मुळे मोटो झेड3 5जी नेटवर्क ला सपोर्ट करेल. कदाचीत येत्या काही काळात कंपनी 5जी मोटो मॉड ला सपोर्ट करणारे अजून फोन आणू शकते.

मोटो झेड3 अमेरिकेच्या बाहेर भारत व इतर देशांमध्ये कधी येईल काहीच सांगता येत नाही. तसेच मोटोरोला फॅन्स आणि सर्व टेक विश्व अजूनही मोटोरोला द्वारा लॉन्च केल्या जाणार्‍या कंपनी च्या पहिल्या नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन मोटो वन पावर ची वाट बघत आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here