1 महिन्यात 120 लाख यूजर जोडून जियो ने घडवला इतिहास

रिलायंस जियो आता पर्यंत देशातील सर्वात वेगाने वाढणारी टेलीकॉम कंपनी म्हणून ओळखली जाते. फक्त 4जी नेटवर्क देणार्‍या या कंपनी ने आपली ही ओळख सिद्ध केली आहे. काही काळापूर्वी रिलायंस जियो भारतात टेलीकॉम कंपन्यांच्या लिस्ट मध्ये चौथ्या नंबर वर होती. पण आता आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत कंपनी देशातील दुसरी सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे. रिलायंस जियो ने फक्त आपल्या टेलीकॉम सर्विसे ने लोकांना आपले फॅन बनवले नाही तर 4जी फीचर फोन जियोफोन ने पण कंपनीला भारतात यश मिळवून दिले आहे.

इंडियन टेलीकॉम इंडस्ट्री संबंधीत एका ताजा रिपोर्ट देशातील टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ट्राई ने सादर केला आहे आणि या रिपोर्ट ने सर्वांनाच धक्का दिला आहे. जियो ने एकाच महिन्यात 120 लाख म्हणजे 1 करोड 20 लाख यूजर्स जोडून नवीन रेकॉर्ड बनवला आहे. ट्राई ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की रिलायंस जियो आधी चौथ्या नंबर वर होती पण आता वोडाफोन व आइडियाला मागे टाकत देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. या शर्यतीत आता वोडाफोन तिसर्‍या तसेच आइडिया चौथ्या नंबर वर सरकली आहे. तसेच भारती एयरटेल अजूनही भारतातल्या सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनीच्या जागी कायम आहे.

ट्राई चा हा रिपोर्ट जुलै महिन्यातील आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की जून च्या शेवट पर्यंत रिलायंस जियो कडे एकूण 215 मिलियन चा यूजर बेस होता. म्हणजे संपूर्ण देशातील 215 मिलियन लोक जियो चा सिम वापरतात. तसेच जुलै महिन्यात जियो ने 12 मिलियन अजून नवीन ग्राहक आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत. जुलै संपता संपता रिलायंस जियो कडे एकूण 227 मिलियन यूजर झाले होते आणि या युजर्सच्या जोरावर कपंनी दुसरी सर्वात मोठी इंडियन टेलीकॉम कंपनी बनली आहे.

रिलायंस जियो कडे जुलै महिन्यात एकूण 227 मिलियन ग्राहक होते. तसेच जुलै महिन्यात वोडाफोन चा एकूण यूजर बेस 223.3 मिलियन होता आणि आइडिया च्या सर्व यूसर्जची संख्या 220.6 मिलियन होती. या यादीत एयरटेल कडे सर्वात जास्त 345 मिलियन यूजर्स आहेत. ट्राई च्या यादीत एयरटेल नंबर एक वर कायम आहे तसेच जियो दुसर्‍या, वोडाफोन तिसर्‍या व आइडिया चौथ्या नंबर वर आहे.

जियो ने एक महिन्यात 12 मिलियन यूजर जोडण्या मागचे मुख्य कारण जियोफोन चा सेल असू शकतो. जुलै महिन्यात कंपनी ने जियोफोन नवीन आॅफर्स व प्लान्स सह सेल साठी उपलब्ध केला होता. कंपनी जियोफोन एक्सचेंज आॅफर अंतर्गत फक्त 501 रुपयांमध्ये विकला होता आणि त्याचमुळे जियो नेटवर्क शी मोठ्या संख्येने मोबाईल यूजर जोडले गेले आहेत.

लक्षात असू दे ट्राई चा हा रिपोर्ट जुलै महिन्याचा आहे. आणि काही दिवसांपूर्वी वोडाफोन आणि आइडिया या दोन कंपन्या एकत्र आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे मिळून यूजर बेस 450 मिलियन च्या वर जाईल. म्हणजे वोडाफोन-आइडिया देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कपंनी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here