
टेक ब्रँड आयटेलनं भारतीय बाजारात आपला पहिला 4G कॉलिंग टॅबलेट iTel PAD 1 लाँच केला आहे. हा टॅबलेट डिवायस 10.1 इंचाच्या मोठ्या आयपीएस डिस्प्ले आणि 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेल्या पावरफुल 6,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे ज्याची किंमत फक्त 12,999 रुपये आहे. पुढे तुम्ही 4G VoLTE + Wi-Fi सपोर्टेड आयटेल पॅड 1 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व सेलची माहिती वाचू शकता.
iTel PAD 1 Price
आयटेल पॅड 1 भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. या टॅबलेटमध्ये 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते ज्याची किंमत 12,999 रुपये आहे. iTel PAD 1 ची विक्री आजपासून सुरु झाली आहे तसेच हा टॅब ऑनलाईन शॉपिंग साइट्स व ऑफलाईल रिटेल स्टोर दोन्ही प्लॅटफॉर्मवरून विकत घेता येईल. पॅड 1 टॅबलेट मार्केटमध्ये deep grey आणि light blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हे देखील वाचा: Honda नं सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स, सिंगल चार्जमध्ये मिळेल जबरदस्त रेंज
iTel PAD 1 Specifications
- 10.1” HD+ IPS Display
- 4G VoLTE + Wi-Fi
- 8MP Front Camera
- 6,000mAh battery
- Android 12 Go Edition
- 4GB RAM + 128GB storage
- Unisoc SC9863A1 processor
आयटेल पॅड 1 मेटल यूनिबॉडी डिजाइनवर बनला आहे जो 1280 x 800 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 10.1 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या चारही बाजूंना रुंद बेजल्स देण्यात आले आहेत तसेच वरच्या बेजल वर सेल्फी कॅमेरा आहे. या टॅबलेटचे डायमेंशन 241.37×160.16×8.2एमएम आहे. या टॅबलेटमध्ये 3.5एमएम आणि ओटीजी सपोर्ट देण्यात आला आहे.
iTel PAD 1 ची खासियत म्हणजे यात सिम कार्डचा वापर करता येतो. हा टॅबलेट 4जी नेटवर्कवर काम करू शकतो तसेच सिमविना देखील हा वायफायच्या माध्यमातून कनेक्ट करता येईल. 4जीबी रॅमसह हा टॅब 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी कार्डच्या माध्यमातून 512जीबी पर्यंत वाढवता येते.
हा टॅबलेट अँड्रॉइड 12 ‘गो’ एडिशन वर चालतो ज्यात गुगल गो अॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात. हे अॅप्स कमी रॅम व स्टोरेजवर देखील स्मूद प्रोसस करतात तसेच इंटरनेट डेटा व बॅटरीचा वापर कमी करतात. प्रोसेसिंगसाठी iTel PAD 1 मध्ये Unisoc SC9863A1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 बद्दल महत्वाची माहिती लीक; जाणून घ्या कधी येणार हा फोन
फोटोग्राफीसाठी टॅबच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेचवहीं सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा डिवायस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी आयटेल पॅड 1 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

















