जापानी ऑटोमोबाइल कंपनी Honda नं आपल्या तीन इलेक्ट्रिक बाइक्स मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. कंपनीनं आपल्या पेट्रोलवर चालणाऱ्या Honda Cub, Dax आणि Zoomer बाइक्स आता बॅटरी व्हर्जनमध्ये आणल्या आहेत. यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला Cub e, Dax e आणि Zoomer e अशी नावे देण्यात आली आहेत. सध्या कंपनीनं या ई-बाइक्स चीन मार्केटसाठी बनवल्या आहेत. भारत किंवा इतर देशांमध्ये या Electric Bikes कधी येतील याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
टॉप स्पीड आणि शानदार ब्रेकिंग सिस्टम
वर सांगितल्याप्रमाणे कंपनीनं या तिन्ही नवीन होंडा ई-बाइक खास चीनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटसाठी बनवण्यात आल्या आहेत. यांचा टॉप स्पीड पाहता या तिन्ही बाइक्समध्ये 25km/h चा स्पीड मिळेल. तसेच नवीन ई-बाइक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्ससह आल्या आहेत. क्यूब ई आणि डॅक्स ई मध्ये रियर मोनो शॉक आहेत, तर झूमर ई मध्ये ट्विन रियर शॉक आहेत. द क्यूब ई मध्ये ड्रम ब्रेक आहेत तर डॅक्स आणि झूमर रियर डिस्क ब्रेकसह येतात. हे देखील वाचा: याच महिन्यात येतील Samsung चे दोन 5G Phone; Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G विषयी महत्वाची माहिती समजली
द क्यूब ई मध्ये 17 इंचाचे टायर्स, गोल हेडलाइट्स आणि 960Wh चा रिमूव्हेबल बॅटरी पॅक आहे. Honda Cub e मध्ये 400W मोटार आणि 65km ची राइडिंग रेंज मिळते. तसेच Honda Dax e मध्ये 1.1kWh ची बॅटरी आहे, ज्यामुळे यात 80km ची रेंज मिळते. ही बाइक 400W मोटारवर चालते आणि 25km/h चा टॉप स्पीड देते. तर झूमर ई एकदा फुल चार्ज केल्यास 90 किमीची रेंज देते. हिच्या बॅटरीची माहिती मात्र मिळाली नाही. विशेष म्हणजे तिन्ही मॉडेल्समध्ये एक चेन-ड्राईव्ह सिस्टम आणि पॅडल आहेत. हे देखील वाचा: Jio, Vi की Airtel कोण देतंय 296 रुपयांमध्ये जास्त फायदे; 30 दिवसांच्या वैधतेसाठी कोणाची करावी निवड
ओरजिनल होंडा क्यूब बाइक 1958 मध्ये सादर करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे ही आतापर्यंतची सर्वाधीक विकली जाणारी मोटार वाहन आहे. होंडानं क्यूबचे 100 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत. आता होंडाची 2025 पर्यंत वेगवेगळ्या बाजारांमध्ये 10 इलेक्ट्रिक मोटरबाइक सादर करण्याची योजना आहे आणि त्यावर कंपनी काम करत आहे. होंडा नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीचा पर्याय निवडू शकते.