बटनवाले फोन Nokia 105 (2023) आणि Nokia 106 4G भारतात लाँच, UPI 123PAY फीचर आहे खास

Highlights

  • यूपीआय 123पे NPCI नं बनवलेली एक इंस्टंट पेमेंट सिस्टम आहे.
  • Nokia 106 4G फोनमध्ये इन-बिल्ट एमपी3 प्लेयर देण्यात आला आहे
  • फोनमध्ये स्नेक गेम आणि टॉर्च लाइट सारखे फीचर्स आहेत

नोकियानं भारतीय बाजारात आपला फीचर फोन पोर्टफोलियो वाढवत आज दोन नवीन मोबाइल सादर केले आहेत. हे बटन असलेले फोन Nokia 105 (2023) आणि Nokia 106 4G नावानं भारतात लाँच झाले आहेत. नवीन नोकिया कीपॅड फोन UPI 123PAY सह येतात ज्यात इंटरनेटविना यूपीआय पेमेंट करता येतं.

नोकिया फीचर फोन प्राइस

Nokia 105 (2023) कंपनीनं फक्त 1,299 रुपयांमध्ये लाँच केले आहेत. हे Charcoal, Cyan आणि Red कलरमध्ये विकत घेता येतील.

Nokia 106 4G फोन भारतीय बाजारात 2,199 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल जो Charcoal आणि Blue कलरमध्ये विकत घेता येईल.

UPI 123PAY फीचर

यूपीआय 123पे NPCI नं बनवलेली एक इंस्टंट पेमेंट सिस्टम आहे जी खास करून फिचर फोन्ससाठी डिजाईन करण्यात आली आहे. हे फीचर इंटरनेटविना यूपीआय पेमेंट करण्याचे स्वातंत्र्य देतं जे पूर्णपणे सेफ व सिक्योर आहे. UPI 123PAY मध्ये चार पर्याय देण्यात आले आहेत ज्यात IVR (interactive voice response) नंबर, फीचर फोन अ‍ॅप, मिस्ड-कॉल आधारित इंटरफेस तसेच proximity sound-based पेमेंटचा समावेश आहे.

नोकिया 106 4जी फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

  • 1,450एमएएच बॅटरी
  • 2,000 कॉन्टेक्ट आणि 500 एसएमएस

नोकिया 106 4जी फीचर फोनमध्ये कंपनीनं आयपीएस डिस्प्ले टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. ह्याची स्क्रीन खूप मोठी आहे जिच्या खाली टी9 कीपॅड देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 1,450एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी एकदा फुल चार्ज केल्यावर मोठा बॅकअप देते.

मनोरंजनसाठी Nokia 106 4G फोनमध्ये इन-बिल्ट एमपी3 प्लेयर देण्यात आला आहे, जोडीला एफएम रेडियो देखील आहे. एफएम वायरलेस पद्धतीनं चालवता येतो. ह्या फोनमध्ये मायक्रो यूएसबी स्लॉट आणि मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. फोनमध्ये स्नेक गेम आणि टॉर्च लाइट सारखे फीचर्स आहेत. ह्या बटन नोकिया फोनमध्ये 2,000 कॉन्टेक्ट आणि 500 एसएमएस सेव्ह करता येतात.

नोकिया 105 (2023) फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

  • 1.8 इंचाची क्यूक्यूवीजीए स्क्रीन
  • 1,000एमएएचची बॅटरी

नवीन Nokia 105 फीचर फोन 1.8 इंचाच्या क्यूक्यूवीजीए स्क्रीनला सपोर्ट करतो. हा मोबाइल एस30+ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. पावर बॅकअपसाठी नोकिया फोनमध्ये 1,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी एकदा फुल चार्ज झाल्यावर अनेक दिवस चालते. ह्या मोबाइलमध्ये देखील वायरलेस एफएम रेडियो मिळतो तसेच ह्यात टॉर्च लाइट देखील देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here