वीवो ने गेल्याच आठवड्यात चीन मध्ये आपल्या झेड सीरीजचा नवीन स्मार्टफोन वीवो झेड3आई लॉन्च केला होता. तसेच आज कंपनी ने आपली झेड सीरीज अंर्तराष्ट्रीय मंचावर वाढवत आजू एक नवीन स्मार्टफोन वीवो झेड3 लॉन्च केला हे. वीवो झेड3 कंपनीच्या जुन्या स्मार्टफोन झेड1 चा अपडेटेड वर्जन म्हणून सादर कारणात आला आहे. हा फोन सध्या चीनी बाजारात लॉन्च झाला आहे, तिथे हा दोन वेगवेगळ्या चिपसेट वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.
वीवो झेड3 इंडिया माडे लॉन्च झालेल्या वी11 प्रो प्रमाणे ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन मेटल फ्रेम वर बनलेला आहे ज्याचा फ्रंट व बॅक पॅनल ग्लास पासून बनलेला आहे. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता यात 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जी ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आली आहे.
कंपनी ने हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.5 वर सादर केला आहे जो कंपनीच्या एआई असिस्टेंट जोवी सह काम करतो. वीवो ने झेड3 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट तसेच स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट च्या वेगवेगळ्या वेरिएंट मधे लॉन्च केला आहे. स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट वाला वेरिएंट 4जीबी रॅमला सपोर्ट करतो तर स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वाल्या वेरिएंट मध्ये कंपनी ने 6जीबी रॅम दिला आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो झेड3 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एआई टेक्नॉलॉजी वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
वीवो झेड3 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन डुअल इंजन फ्लॅश चार्जिंग टेक्नोलॉजी वाल्या 3,315एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतो. किंमत पाहता वीवो झेड3 चा 4जीबी/64जीबी वेरिएंट 1598 युआन (जवळपास 16,900 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोनचा 6जीबी/64जीबी वेरिएंट 1898 युआन (जवळपास 20,000 रुपये) तर 6जीबी/128जीबी वेरिएंट 2298 युआन (जवळपास 24,300 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
















