शाओमी देशातील सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. हि बाब फक्त शाओमी फॅन्स नाही तर देशातील स्मार्टफोन बाजारावर नजर रखने ठेवणाऱ्या रिसर्च फर्म ने पण सांगतिले आहे. आईडीसी च्या लेटेस्ट रिपोर्ट ने सांगितले आहे कि शाओमी लागोपाठ 5व्यांदा भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. शाओमी ने आपल्या या यशाचे श्रेय आपल्या यूजर्सना दिले आहे. हा आनंद सेलिब्रेट करत शाओमी इंडिया ने आपल्या फॅन्स साठी पण शानदार भेट आणली आहे. शाओमी ने एक साथ आपल्या 5 हिट स्मार्टफोन्स च्या किंमती कमी केल्या आहेत.
शाओमी ने रेडमी आणि मी सीरीजच्या हिट स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. शाओमी ने आपल्या खालील सर्व स्मार्टफोन्सच्या किंमतीती थेट 1,000 रुपयांची कपात केली आहे. हा प्राइस कट आॅनलाईन प्लॅटफार्म सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण लागू होईल आणि आज पासून शाओमी चे हे स्मार्टफोन्स नवीन किंमती सह येतील. प्राइस कट मध्ये मी सीरीजचा मी ए2 स्मार्टफोन तसेच रेडमी सीरीजचा रेडमी वाय2 आणि रेडमी नोट 5 प्रो सामील आहे.
2nd big news of #Super3! ?
To celebrate No. 1 position for 5 Qs, we are dropping prices of 5 phones by ₹1000!
* Redmi Y2 (4+64): ₹11999
* RN5Pro (4+64): ₹13999
* RN5Pro (6+64): ₹15999
* Mi A2 (4+64): ₹15999
* Mi A2 (6+128): ₹18999#HonestPricing #1SmartphoneBrand (2/2) pic.twitter.com/DD7f4ckq6Q— Manu Kumar Jain (@manukumarjain) November 16, 2018
सर्वात आधी मी ए2 पाहता कंपनी ने 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केलेला 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट आता 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 19,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला मी ए2 चा 6जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12,999 रुपयांचा रेडमी वाय2 चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपये तसेच 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
शाओमी रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी जो आता पर्यंत 14,999 रुपयांमध्ये विकला जात होता तर आता या वेरिएंटची किंमत 13,999 रुपये झाली आहे तसेच 16,999 रुपयांचा रेडमी नोट 5 प्रो 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट आता 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे आईडीसी च्या रिपोर्ट अनुसार मागील तिमाहीत एकट्या शाओमी ने इंडियन स्मार्टफोन बाजाराच्या 27.3 प्रतिशत हिस्स्यावर कब्जा केला आहे.














