सॅमसंग आणेल वी आणि ओ शेप नॉच असलेला फोन, गॅलेक्सी एम2 असेल पहिला डिवाइस

काही महिन्यांपूर्वी बातमी आली होती कि सॅमसंग आपल्या जे सीरीजचे फोन बंद करेल आणि नवीन सीरीज घेऊन येईल. कंपनी आता एम सीरीजचे फोन सादर करू शकते. नुकतीच सॅमसंग गॅलेक्सी एम मॉडेलची माहिती पण लीक झाली आहे. हा फोन बेंचमार्क साइट एनटूटू आणि गीकबेंच दिसला आहे. तर आज सॅमसंग गॅलेक्सी एम बद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. बातमी नुसार सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजच्या पहिल्या फोन मध्ये वाटर ड्रॉप नॉच असू शकते.

सॅमसंगची हि नवीन सीरीज कंपनीच्या बजेट सेग्मेंट फोन जे, सी आणि आॅन मॉडेलला रिप्लेस करेल. जे, सी आणि आॅन सीरीज खासकरून आशियातील देशांसाठी आहे ज्यात भारत मुख्य आहे. कंपनी एम सीरीजचे फोन साल 2019 च्या सुरवातीला सादर करू शकते आणि कंपनी सर्वात आधी गॅलेक्सी एम2 लॉन्च करू शकते.

गेल्याच महिन्यात कंपनीने 4 नवीन डिस्प्लेज सादर केले होते. ज्यात काही नॉच तर काही फोन नॉच विना उपलब्ध होते. त्यामुळे अंदाज लावला जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 मध्ये फुल बेजल लेस डिस्प्ले असेल तर सॅमसंग एम2 ओ किंवा वी शेप नॉच सह सादर केला जाऊ शकतो. फोनअरीना ने दिलेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या आगामी फोन साठी इनफिनिटी टॅगलाइन सह ओ आणि वी पण आणेल. म्हणजेच नवीन डिस्प्ले इनफिनिटी—ओ, इनफिनिटी—वी आणि इनफिनिटी—यू नावाने सादर केले जातील.

सॅमसंग गॅलेक्सी एम चे स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 2340×1080 पिक्सल रेजल्शून सह 19.5:9 आसपेक्ट रेशियो असलेली मोठी स्क्रीन मिळू शकते. सोबतच फोन मध्ये 3जीबी रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज असू शकते.

नुकताच जो फोन लीक झाला होता त्यात एक्सनोस 7885 प्रोसेसर दिसला होता. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर यात 13—मेगापिक्सलचा मेन आणि 8—मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. अजूनतरी बॅटरीची माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here