वीवो ने कमी केली वाय95 स्मार्टफोनची किंमत, बघा नवीन किंमत

जर तुम्ही नवीन वर्षात स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हि अगदी योग्य वेळ आहे. आता पर्यंत अनेक कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करून ग्राहकांना अनेक ऑप्शन दिले आहेत. आता वीवो ने आपला दुसरा स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. याआधी कंपनी ने आपल्या फ्लॅगशिप डिवाइस वीवो नेक्स ची किंमत 5,000 रुपयांनी कमी केली होती. यावेळी कंपनी ने वीवो वाय95 स्मार्टफोनच्या किंमतीती 1,000 रुपयांची कपात केली आहे.

वीवो ने गेल्या वर्षी वाय95 हॅलो नॉच सह सादर केला होता, ज्याची किंमत लॉन्चच्या वेळी 16,990 रुपये होती. आता 1,000 रुपयांच्या कपातीनंतर डिवाइस 15,990 रुपयांमध्ये उपलब्ध केला जात आहे. डिवाइस या किंमतीती ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमातून विकत घेता येईल.

वीवो वाय95 चे स्पेसिफिकेशन
वीवो वाय95 ‘वी’ शेप वाल्या हेलो नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. वीवोचा हा नवीन फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.22-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. वाय95 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.5 ओएस वर सादर करण्यात आला आहे जो 1.9गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने वाय95 4जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. वाय95 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वीवो वाय95 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोन मध्ये पावर बॅकअप साठी ओटीजी सपोर्ट सह 4,030एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here