Realme 10 Pro झाला चीनमध्ये लाँच; फोनमध्ये 120Hz चा डिस्प्ले

रियलमी कंपनीनं आज टेक मंचावर आपली लेटेस्ट Realme 10 Pro Series लाँच केली आहे. सीरीज अंतगर्त दोन नवीन 5जी रियलमी फोन बाजारात सादर करण्यात आले आहेत, ज्यात Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G चा समावेश आहे. स्टाईलिश लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह येणारे हे रियमली मोबाइल्स सर्वप्रथम चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध होतील त्यानंतर भारतात लाँच केले जातील. पुढे आम्ही या सिरीजमधील बेस मॉडेल रियलमी 10 प्रो 5जी फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Realme 10 Pro Specifications

रियलमी 10 प्रो स्मार्टफोन कंपनीनं 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. ही फ्लॅट एज स्क्रीन आहे ज्यात तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: कोणालाही न सांगता Jio नं बंद केले दोन लोकप्रिय प्लॅन; नवीन पर्याय न दिल्यामुळे युजर्स नाराज

Realme 10 Pro 5g launch price feature specifications sale details

Realme 10 Pro अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित कंपनीच्या रियलमी वनयुआय 4 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे इंटरनल रॅम बूस्ट करवून हेव्ही प्रोसेसिंगचा लोड कमी होतो. Realme 10 Pro फोनमध्ये 8GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंतची UFS 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Realme 10 Pro 5g launch price feature specifications sale details

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 प्रो ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन रियलमी मोबाइल फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Exclusive: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅमसह येतोय iQOO 11 Legend; वनप्लसला टाकेल का मागे?

Realme 10 Pro Price

Realme 10 Pro स्मार्टफोन चीनमध्ये दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज मिळते. बेस व्हेरिएंटची किंमत 1,599 युआन (सुमारे 18,300 रुपये) आहे तर मोठा व्हेरिएंट 1,899 युआन (सुमारे 22,000 रुपये) मध्ये खरेदी करता येईल. Realme 10 Pro स्मार्टफोन चीनमध्ये Sea Blue, Night Black आणि Starlight कलरमध्ये विकत घेता येईल. लवकरच हा फोन भारतीयांच्या भेटीला देखील येईल, परंतु भारतीय किंमत वेगळी असू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here