Hero Electric Cycle Launch: भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर, बाइक आणि कार सोबतच सायकलची मागणी वाढत आहे. हे पाहून भारतात इलेक्ट्रिक सायकल सेगमेंट मधील सर्वात मोठी कंपनी हीरो लेक्ट्रो (Hero Lectro) वेळावेळी ई-सायकलचे नवनवीन मॉडेल लाँच करत असते. आता कंपनीनं दोन नवीन ई-सायकल H3 आणि H5 भारतीय बाजारात लाँच केल्या आहेत. या दोन्ही ई-सायकलची खासियत म्हणजे या GEMTEC पावर्ड आहेत. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक सायकलची किंमत, रेंज आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती.
Hero H3 and H5 Electric Cycle Price
प्राइस पाहता कंपनीनं H3 इलेक्ट्रिक सायकल 27,499 रुपये आणि H5 ई-सायकल 28,499 रुपयांमध्ये सादर केली आहे. तसेच, कलर ऑप्शन पाहता H3 दोन कलर ऑप्शन ब्लिसफुल ब्लॅक-ग्रीन आणि ब्लेजिंग ब्लॅक-रेड मध्ये सादर करण्यात आल्या आहेत. तसेच H5 सायकल ग्रूवी ग्रीन आणि ग्लोरियस ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: BSNL बंद करणार आहे 75 दिवस वॅलिडिटी असलेला प्लॅन; लवकरच घ्या फायदा
Hero H3 आणि H5 Electric Cycle ची वैशिष्ट्ये
वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही ई-सायकल GEMTEC पावर्ड आहेत. GEMTEC मटेरियलपासून बनवण्यात आल्या आहेत, त्यामुळे या इलेक्ट्रिक सायकल मजबूत तर होतातच परंतु यांचं वजन वाढत नाही, त्या हलक्या असतात. या GEMTEC ई-सायकल्स कंपनीच्या D2C वेबसाइटसह हीरो लेक्ट्रोच्या 600 पेक्षा डीलर्सच्या नेटवर्क, ई-कॉमर्स साइट्सवर विकल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या शहरामधील कंपनीच्या स्पेशल एक्सपीरियंस सेंटरवरून देखील या विकत घेता येतील. हीरो लेक्टरोचे एक्सपीरियंस सेंटर दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आहेत. हे देखील वाचा: 200MP कॅमेऱ्यासह येईल Samsung Galaxy S23 Ultra; संपूर्ण Galaxy S23 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा
मिळेल 30km ची रेंज
हीरो लेक्ट्रो H3 आणि H5 इलेक्ट्रिक सायकल एकदा चार्ज केल्यावर 30km अंतर पार करू शकतात. म्हणजे कमी अंतरावरील कामे पूर्ण करण्यासाठी ही एक शानदार सायकल म्हणता येईल. ऑफिस ट्रॅव्हल, शॉपिंग किंवा व्यायामासाठी देखील या सायकल्सचा वापर करता येईल. या दोन्ही सायकलमध्ये एक LED डिस्प्ले आहे, ज्यात स्पीड, बॅटरी आणि अन्य इंडिटेक्टर दिसतात. सायकलमध्ये 250W बीएलडीसी रियर हब मोटर आहे, जी मॅक्सिमम ताशी 25 किमीचा टॉप स्पीड गाठू शकते. तसेच, यात IP67 ली-आयन 5.8Ah इंट्यूब बॅटरी आहे, जी 4 तासांत पूर्णपणे चार्ज होते आणि वॉटरप्रूफ आहे.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.